
Mexican Style Street Corn Salad for Breakfast
sakal
Easy Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता नेहमी पौष्टिक आणि स्वादिष्ट असावा असे सर्वांचे मत असते. त्यामुळे नेहमीच्या पोहे-उपम्याऐवजी काहीतरी नवीन आणि ऊर्जा देणारे करून बघा आणि तयार करा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड!
हे सॅलड केवळ दिसायला सुंदर नाही तर खायलाही अप्रतिम आहे. बटरमध्ये भाजलेला मक्याचा स्वाद, त्यात लिंबाचा ताजेपणा, थोडं चीज, आणि मसाल्यांचा झणझणीतपणा मिळून तयार होतो सकाळच्या उर्जेचा आणि चवीचा परिपूर्ण डोस!