esakal | उन्हाळ्यात काही हलकेसे खावेसे वाटते. मग कोणत्या रेसिपीज ट्राय करावी? जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्यात काही हलकेसे खावेसे वाटते. मग कोणत्या रेसिपीज ट्राय करावी? जाणून घ्या

उन्हाळ्यात काही हलकेसे खावेसे वाटते. मग कोणत्या रेसिपीज ट्राय करावी? जाणून घ्या

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

उन्हाळ्यात काही हलकेसे खावेसे वाटते. मग कोणत्या रेसिपीज ट्राय करावी? आम्ही तुम्हाला अशाच काही रेसिपीजविषयी सांगणार आहोत, जी स्वादिष्ट असतील आणि हलकी असल्याने ती पचायला त्रास होणार नाही. चर चला जाणून घेऊ...

१. कैरी डाळ आणि भात

- आता उन्हाळा असल्याने आंबे बाजारात आलेले असतात. कैरी डाळ आणि भात खाणे ही एक वेगळीच मजा असते.

साहित्य

- १/२ कप डाळ, १ मीडियम कैरी, २-३ चमचे तूप, २-३ चमचे कोथिंबीर, १५-२० कढीपत्ता, २ हिरव्या मिरच्या, १/४ तेल, १/४ छोटे चमचे जीरा, १ चिमूटभर हिंग, १ छोटा चमचा लाल मिरची पावडर, १/४ छोटा चमचा हळदी पावडर, १ छोटा चमचा धने पावडर, १ छोटा चमचा नमक

कृती

- डाळ धुवून ३० मिनिटांसाठी पाण्यात भिजवा

- आता एका कुकरमध्ये डाळ, थोडे मीठ, थोडी हळदी टाकून गॅसवर शिजण्यासाठी ठेवा.

- जेव्हा कुकरची दोन शिट्या होतील तेव्हा गॅस बंद करा.

- कैरी धुवा. तिचे छोटे-छोटे बारीक भाग कापा.

- पॅनमध्ये तूप टाकून गरम करा. त्यात जीरा, तेल, कैरीचे टुकडे भाजून घ्या.

- त्यात हळदी पावडर, धने, हिंग, कडीपत्ता आदी टाकून परतून घ्या.

- हे झाकून ३- ४ मिनिटांपर्यंत ठेवा

- त्यानंतर त्यात डाळ टाका आणि एक उकळी येऊ द्या.

- तुमची कैरी डाळ तयार

- हे भाताबरोबर खा.

२. आमरस आणि पुरी

- उन्हाळ्यात सर्वांत प्रसिद्ध खाणे म्हणजे आमरस आणि पुरी. हा एक गुजराती खाद्यपदार्थ आहे.

साहित्य

- १ कप आमरस, १/४ कप बुंदी, १ कप ताक, १/२ कच्चे प्युरी, १/४ कप बेसन, १/४ कप कोथिंबीरचे पाने, १/४ कप कढीपत्ता, १/२ छोटा चमचा मेथी दाणे, १/२ छोटे चमचे मीठ, एक साबूत लाल मिरची, २ हिरवी मिरची, १ छोटा चमचा जीरा, १ छोटा चमचा ग्रेट केलेले आद्रक, १/२ छोटे चमचे हळदी पावडर, चिमूटभर हिंग, १ छोटा सरसोचे दाणे, १/२ छोटा चमचा लाल मिरची पावडर

कृती

- सर्वप्रथम बेसनमध्ये अगोदर ताक मिसळून पातळ करु घ्या.

- त्यानंतर आंबे, कैरीचे प्युरी आणि थोडे ताक टाकून चांगल्या प्रकारे पातळ करुन घ्या.

- आता बेसन पेस्ट आणि आमरस चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि त्यात लाल मिरची पावडर, हिंग टाका

- आता एक पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात जीरा, तेल, मेथीचे दाणे टाकून भाजा

- त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची भाजून घ्या

- आता त्यात आमरस टाका आणि त्यानंतर एक उकळी आल्यावर बुंदी आणि मीठ टाका

- आता तडक्यासाठी एक पॅनमध्ये तेल, वाळलेली मिरची, कोथिंबीर भाजून त्यावर टाका

- याच्याबरोबर पुरी खा म्हणजे खूप भारी वाटेल.

३. दही भात

- उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणारा खाद्यपदार्थ म्हणजे दहीभात. उन्हाळ्यात हा सहज बनवला जाणारा खाद्यपदार्थ आहे. हे खाण्यास अनेक जणांना आवडते.

साहित्य

- १ कप तांदूळ, १०-१२ कढीपत्ता, 1/2 चमचे तेल, कापलेली कोंथिबीर, १ कप साधा ही, चिमूटभर हिंग, २ कापलेली हिरवी मिरची, सेंधा मीठ चवीनुसार

कृती

- सर्वप्रथम तांदूळ शिजवून

- आता एक पॅनमध्ये थोडेसे तेलात कढीपत्ता, सरसो, हिंग आदी टाकून तडका लावा.

- आता भातात दही आणि कापलेली कोथिंबीर मिसळून वरुन तडका टाका

- तुम्हाला हवे असेल कांदा, टोमॅटो आदीही टाकू शकता. दहीभातात चाट मसाला खूप चांगला लागतो.

- तुमचा दहीभात तयार

Edited By- Archana Banage