
Sweet dhokla recipe for breakfast: सकाळच्या नाश्त्याला काहीतरी चविष्ट आणि हलके खायचे असेल तर गोड ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. गुजरातची ही पारंपरिक डिश बेसन, रवा, साखर आणि दह्यापासून बनवली जाते, जी चवीला गोड आणि रुचकर असते. हा ढोकळा स्टीम करून तयार होतो, त्यामुळे तो हलका आणि पचायला सोपा आहे.
वेलची आणि केशराच्या सुगंधाने याला खास टच मिळतो, तर दही किंवा मधासोबत सर्व्ह केल्यास चव आणखी खुलते. गोड ढोकळा बनवणे अत्यंत सोपे आहे आणि कमी वेळेत तयार होतो. त्यामुळे व्यस्त सकाळीही हा पदार्थ लवकर बनवता येतो.
यात प्रथिने आणि कर्बोदके यांचे संतुलन असल्याने तो पौष्टिक आणि समाधानकारक आहे. यासाठी विशेष साहित्याची गरज नाही; घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून तुम्ही हा स्वादिष्ट नाश्ता बनवू शकता. चला तर, जाणून घेऊया गोड ढोकळा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.