ग्लॅम-फूड : ‘मनसोक्त खा; मजेत जगा’ | Tamanna Bhatia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamanna Bhatia
ग्लॅम-फूड : ‘मनसोक्त खा; मजेत जगा’

ग्लॅम-फूड : ‘मनसोक्त खा; मजेत जगा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- तमन्ना भाटिया

वयाच्या पंधराव्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारी तमन्ना फिटनेसबाबत अधिक सजग आहे. खाण्यावर तिचे मनापासून प्रेम आहे. मुळातच खवय्यी असणारी तमन्ना क्रॅश डाएटच्या पूर्णपणे विरोधात आहे. मनसोक्त खाण्यावर ती भर देते. ‘साउथ इंडियन’ पद्धतीचे खाद्यपदार्थ तिला आवडतात. याशिवाय ‘ऑथेंटिक तेलंगणा फूड’ तिचे फेव्हरेट आहे. त्यातील ‘पेसरट्टू’ हा तिचा आवडता पदार्थ आहे.

तमन्ना दिवसाची सुरुवात मध आणि लिंबाचा रस घातलेले गरम पाणी पिऊन करते. तसेच भिजवलेले बदामही खाते. सकाळी नाश्त्याला एक वाटी म्युसली खाते, ज्यात ग्रॅनोला, खजूर, काजू, बेरी, केळी, बदामाचे दूध यांचा समावेश असतो, तर कधी फक्त ओटमिल, इडली, डोसा, चटणी आणि सांबार खाते. दुपारच्या जेवणात एक वाटी भात, एक वाटी दाल आणि भाजी असा साधारण आहार असतो. रात्रीच्या जेवणात एग व्हाइट्स किंवा ग्रील्ड फिश, चिकन आणि व्हेजिटेबल्स असा आहार घेणे ती पसंत करते. याशिवाय मिड मिल स्नॅक म्हणून सूप किंवा मलाईचादेखील खाण्यात समावेश करते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो, असे तिचे म्हणणे आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काजू, फ्लेक्स, पमकीन सीड्स, फिश लिव्हर ऑइल, ऑलिव्ह ऑइल यांचा समावेश खाद्यपदार्थांत असेल याकडे तिचा कटाक्ष असतो. दिवसातून एकदा ती बटर कॉफी पिते. फ्रोझन फूड आणि साखरयुक्त पदार्थ खाणे ती टाळते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती कायम प्रयत्नशील असते. दिवसभरात नारळ पाणी आणि फ्रूट ज्यूस प्यायला ती प्राधान्य देते.

आहारात ती जास्तीत जास्त दह्याचा समावेश करते. अनेक सेलिब्रेटीज आहारात भाताचा समावेश करणे टाळतात; परंतु तमन्ना मात्र ‘राइस लव्हर’ आहे. तशी पोस्टदेखील तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती. ‘चीट डे’ला आइस्क्रीम, चॉकलेट, पास्ता, चीज फ्राइज आणि फ्राइड फूड खाणे ती पसंत करते. त्यातही हेल्दी पर्याय म्हणून प्रोटिन चॉकलेटही तिला आवडते.

तमन्नाला खाण्याबरोबरच स्वयंपाकाचीही आवड आहे. लॉकडाउनमध्ये तिने ग्लुटेन आणि शुगर-फ्री बनाना वॉलनट मफीन्स बनवले होते. ती पॅनकेक, फ्रेंच टोस्टसुद्धा छान बनवते. मात्र, आईच्या हातच्या आलू पराठ्यांची सर इतर कुठल्याही पदार्थांना नसल्याचे ती सांगते. एका शोमध्ये तमन्नाच्या आईने तिच्यासाठी सिंधी कढी आणि डोसा बनवला होता, जो तिला अतिशय प्रिय आहे. ‘मास्टर शेफ तेलगू’ हा शोदेखील तिने होस्ट केला होता.

loading image
go to top