Breakfast Recipe : उरलेल्या चपात्या टाकू नका; नाश्त्याला 'ही' रेसिपी ट्राय करा, खाणारे बोटंच चाटत राहतील!

उरलेल्या चपात्यांचं काय करायचं हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. त्याचं उत्तर आहे आमच्याकडे..
Leftover rotis breakfast recipe
Leftover rotis breakfast recipeSakal

शनिवार - रविवार म्हणजे वीकेंड. सुट्ट्यांचे दिवस. या दिवशी रोज कामावर जाणारे परिवारातले सदस्य घरातच असतात. मुलांना शाळांना सुट्ट्या असतात. अशावेळी सगळ्यांना रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं खायचं असतं. अशीच एक सोप्पी पण टेस्टी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामुळे दोन गोष्टी होतील, रात्रीच्या चपात्या राहिल्या असतील, तर त्याही संपतील आणि घरच्यांना काहीतरी वेगळं, चटपटीत खायला मिळेल. (Food Recipe News)

साहित्य:

  • 3-4 उरलेल्या चपात्या

  • 1 कांदा,

  • 1 टोमॅटो,

  • चिरलेली 1 सिमला मिरची,

  • चिरलेलं 1 गाजर,

  • चिरलेले व उकडलेले अर्धी वाटी मटार

  • 3-4 चमचे किसलेले पनीर

  • 3-4 चमचे उकडलेले कॉर्न

  • 3-4 लवंगा

  • 4 चमचे सॉस

  • 4-5 चमचे चीज स्प्रेड

  • 1 टीस्पून ओरेगॅनो

  • 1 टीस्पून लाल तिखट

  • 1 टीस्पून काळी मिरी पावडर

  • अर्धा कप किसलेले मोझरेला चीज 2 टीस्पून मैदा

  • तळण्यासाठी तेल

  • पाणी

  • मीठ चवीनुसार

  • कृती :

  • कढईत २ चमचे तेल घालून भाज्या परतून घ्या. लसूण, कांदा, टोमॅटोपासून सुरुवात करा आणि नंतर त्यात पनीर आणि इतर भाज्या घाला.

  • त्यावर ओरेगॅनो, लाल तिखट/पावडर, काळी मिरी पावडर आणि मीठ टाका.

  • मिक्स करा आणि १० मिनिटे शिजू द्या.

  • पूर्ण झाल्यावर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

  • आता उरलेली चपाती घ्या, त्यावर टोमॅटो सॉस आणि चीज पसरवा.

  • त्यावर शिजलेली भाजी भरून मोझझेरेला चीज घाला आणि चपाती अर्धा फोल्ड करून डी आकार द्या.

  • आता चपातीच्या कडा चाकू किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने कापून घ्या.

  • मैदा आणि पाण्याची पेस्ट बनवा. ते चपातीच्या काठाच्या आत लावा आणि टोके बंद करण्यासाठी नीट दाबा.

  • झाल्यावर तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या आणि टोमॅटो केचपसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com