Tawa Paneer Burger| घरी बनवा तवा पनीर बर्गर, ही आहे रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tawa Paneer Burger
Tawa Paneer Burger| घरी बनवा तवा पनीर बर्गर, ही आहे रेसिपी

Tawa Paneer Burger| घरी बनवा तवा पनीर बर्गर, ही आहे रेसिपी

तुम्हाला बर्गर खूप आवडतयं का ? आता तुम्ही घरच्या घरी बर्गर बनवू शकता. तर चला जाणून घेऊ या तवा पनीर बर्गरच्या (Tawa Paneer Burger Recipe) स्वादिष्ट रेसिपीविषयी...

साहित्य

- १ /२ कप दही

- १ /२ टी स्पून काळी मिरची

- १ /२ टी स्पून चाट मसाला

- चवीनुसार मीठ

- २ बन पाव

- १ टोमॅटो ( बारीक कापलेला)

- १ कांदा ( बारीक कापलेला)

- पनीर स्लाईस

- टोमॅटो केचप

- मस्टर्ड साॅस

हेही वाचा: घरच्या घरी बनवा ओट्स मंचुरियन, ही आहे रेसिपी

कृती

- हे बर्गर बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक मोठी वाटी घ्या आणि त्यात दही, लाल मिरची पावडर, काळी मिरची, मीठ आणि चाट मसाला टाकून एकत्र करुन घ्या.

- या तयार मॅरिनेडला पनीरच्या प्लेटमध्ये टाकून सोनेरी रंग येईल पर्यंत तळून घ्या. त्यानंतर टोमॅटो, कांदा आणि काकडी बारीक कापून घ्या.

- एक बन पाव घ्या. ते तूप आणि थोड्याशा लाल मिरचीत टोस्ट करा.

- आता सर्वप्रथम बनवर टोमॅटो केचप टाका आणि तयार पनीर टाका

- त्यात कापलेल्या भाज्या टाका. त्यावर एक पनीरचा तुकडा ठेवा.

- दुसऱ्या बन पाववर मस्टर्ड साॅस टाका.

- आता बर्गरच्या मधोमध तुमचे आवडते साॅस टाकू शकता.

- फ्राय करा आणि खाण्यासाठी तवा पनीर बर्गर तयार आहे.

loading image
go to top