

Finnish Food
Sakal
Healthy Food : थंड हवामान, स्वच्छ निसर्ग, साधेपणा आणि आपलेपणा या सगळ्यांचे सुंदर मिश्रण म्हणजे फिनलंड. फिनलंडची खाद्यसंस्कृती ही निसर्गाशी जवळीक व ताजे घटक यासाठी प्रसिद्ध आहे. तेथे आरोग्यपूर्ण आहाराला खूप महत्त्व दिले जात असून, रोजच्या स्वयंपाकात मीट, मासे, दुग्धजन्य पदार्थ, भरडधान्य, विविध प्रकारच्या बेरीज, मटार व मशरूम यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.