
History of Tacos and Taco Tuesday Tradition: टाको हा मूळचा मेक्सिकोमधील पारंपरिक आणि अतिशय लोकप्रिय असा खाद्यपदार्थ असून त्याचा इतिहास अनेक शतके जुना आहे. टाकोचा उगम मेक्सिकोतील स्थानिक आदिवासी संस्कृतीत झाला. हे आदिवासी लोक मक्याच्या पिठापासून बनवलेल्या पुरीमध्ये मासे, मीट, भाजी असे पदार्थ भरून ती पुरी अर्ध्यामध्ये दुमडून खात असत. साध्या; पण चविष्ट अशा या पदार्थाचा अल्पावधीतच मेक्सिकोभर प्रसार झाला. हाच तो टाको नावाचा पदार्थ पुढे मेक्सिकोची राष्ट्रीय ओळख ठरला. आज मेक्सिकोतील प्रत्येक शहरात आणि गावात अगदी रस्त्याच्या कोपऱ्याकोपऱ्यावर टाकोचे स्टॉल्स आढळतात.