
उपाशी पोटी शरीराला कार्बोहायड्रेटची गरज, नाश्त्यात हे पदार्थ नक्की ट्राय करा
अनेकदा सकाळच्या नाश्त्यात काय खायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकजण सकाळी नाश्त्यात पौष्टीक पदार्थ खाण्याचा विचार करतात. मात्र कधी कधी सकाळी केलेल्या चुकीच्या नाश्त्याने अनेकदा आपला दिवस निकामी जातो. आज आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पौष्टीक आणि स्वादिष्ट नाश्ता करता येणार. (The healthiest breakfast to have in the morning check here)
हेही वाचा: प्रसूतीनंतर महिलांनी थंड पाणी टाळणे गरजेचे आहे का ? जाणून घ्या सत्य...
ओट्सची इडली
ओट्सची इडली पचनास हल्की व मऊ असते. ओट्सचा वापर करुन तुम्ही इडली बनवू शकता.ही सकाळच्या नाश्त्याचा उत्तम आहार आहे.
शेवया
शेवयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहाइड्रेट असतात जी शरीराला उर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शेवया बनवताना तुम्ही त्यात विविध प्रकारच्या भाज्या टाकू शकता. यामुळे त्यातील व्हिटॅमिन आणि प्रोटीन वाढते. याचा फायदा मानसिक आणि शारीरिक दोन्ही वाढीसाठी होतो. त्यामुळए सकाळच्या नाश्त्यामध्ये शेवया खाणे चांगले असते.
हेही वाचा: उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ टिकत नाही; या सोप्या टिप्स फॉलो करा
रवा उपमा
रवा उपमा हा शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असा नाश्ता आहे. रव्यामध्ये ऊर्जा, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर अशा पोषक तत्व असून यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम याचेही प्रमाण असते.या सगळ्याचा आपल्या शरीरासाठी फायदा होत असल्यामुळे आपण रवा नेहमी आपल्या सकाळच्या नाश्त्यात असायला हवा
मिसळ पाव
पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थ मिसळ पाव हा सकाळचा उत्तम नाश्ता आहे. यामध्ये निरनिराळ्या प्रकाराच्या भाज्यांचा समावेश करावा यामुळे पौष्टीक नाश्ता आपल्याला मिळतो.
दाळीपासून पराठे
दिवसाच्या किंवा रात्रीच्या उरलेल्या दाळीपासून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं पराठे बनवू शकता.हा पौष्टीक नाश्ता म्हणता येईल.
Web Title: The Healthiest Breakfast To Have In The Morning Check Here
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..