प्रसूतीनंतर महिलांनी थंड पाणी टाळणे गरजेचे आहे का ? जाणून घ्या सत्य... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mother child

प्रसूतीनंतर महिलांनी थंड पाणी टाळणे गरजेचे आहे का ? जाणून घ्या सत्य...

मुंबई : प्रसूतीनंतर महिलांना शरीराची झिज भरून काढावी लागते. यासाठी त्यांना गरम पदार्थ खायला दिले जातात. याउलट, त्यांना थंड पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात प्रसूती झालेल्या महिलांना थंड पाणी प्यावेसे वाटू शकते; मात्र यामुळे त्यांचे शरीर पूर्ववत होण्यास वेळ लागेल असे सांगितले जाते. खरेच असे आहे का ?

हेही वाचा: मुलांच्या भावनिक विकासासाठी तुम्ही काय करता ? बुद्ध्यांकापेक्षा महत्त्वाचा आहे भावनांक

थंड पाणी प्यायल्याने शरीर पूर्ववत होण्यास विलंब होतो हे सत्य नाही. शरीराची झिज भरून निघण्याची प्रक्रिया तुमची प्रसूती नैसर्गिकरित्या झाली आहे की सिजेरीयन आणि तुम्हाला इतर कोणते आजार आहेत का, प्रसूतीमध्ये काही गुंतागुंत होती का यांवर अवलंबून असते. बाळंतपणादरम्यान आईला मिळालेला आहार, व्यायाम आणि आराम या गोष्टीही महत्त्वाच्या असतात.

हेही वाचा: मुलांचं किशोरवय हाताळताना....

शारीरिक झिज भरून काढण्यासाठी प्रसूतीनंतर गरम पाणी प्यावे असे सांगितले जाते. थंड पाणी प्यायल्याने सर्दी होते व गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यात अडथळे येतात असा समज आहे. थंड पाणी प्यायल्याने आईच्या दुधाच्या गुणवत्तेत आणि तापमानात फरक पडतो. यामुळे बाळाला सर्दी होते, असेही म्हटले जाते.

प्रसूतीनंतर पुरेसे पाणी पित राहाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पुरेसे पाणी न प्यायल्याने निर्जलीकरण, बद्धकोष्ठता आणि मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे प्रसूतीनंतर पुरेसे पाणी प्यावे. अशावेळी शरीरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याची माहिती केवळ स्त्रीरोगतज्ज्ञांकडूनच घ्यावी.

Web Title: Is It True That Drinking Cold Water After Delivery Slow Down The Recovery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ParentsPregnancy Tips
go to top