esakal | नूडल्स बनवण्याच्या विविध पद्धती; जाणून घ्या रेसिपी

बोलून बातमी शोधा

नूडल्स बनवण्याच्या विविध पद्धती; जाणून घ्या रेसिपी
नूडल्स बनवण्याच्या विविध पद्धती; जाणून घ्या रेसिपी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या काळात बाहेर जाऊन खाद्यपदार्थ खाणे कोणत्याही व्यक्तीला थोडे कठीणच आहे. यासाठी तुम्ही घरी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय करत असता. बरेच लोक या दिवसात स्ट्रीट फूडला मिस करत आहेत. याच स्ट्रीट फूड मध्ये समाविष्ट असलेले नूडल्सही अनेकजण मिस करत आहेत. तुम्ही जर या नूडल्सला मिस करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही नूडल्स रेसिपी सांगणार आहोत जी तुमची टेस्ट लाजवाब बनवेल. नूडल्सच्या या वेगळ्या डिश तुम्ही खूप कमी वेळात बनवू शकता. तसेच लहान मुलांनाही नुडल्स आवडतात. ही डिश मुले आवडीने खातात. आपण ही सोपी रेसिपी जाणून घेऊयात..

१. एग नूडल्स

साहित्य -

नूडल्स- 300 ग्रॅम, अंडे-3, आलं पेस्ट-1/2 चमचे, काळी मिरची-1/2 चमचे, सिरका-1/2 चमचे सोया सॉस-1 चमचा, मीठ-चवीनुसार, कांदा पेस्ट-1 चमचा, हिरवी मिरची- 3 बारीक कट केलेली, हिरवी भाजी-1/2 कप ऑप्शनल

कृती -

सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये काही वेळासाठी नूडल्स गरम करायला ठेवा. आणि त्यानंतर त्यातील पाणी बाजूला करा. दुसऱ्या एका भांड्यामध्ये तुम्ही अंड्या सोबत आलं पेस्ट, कांदा पेस्ट घालून हे मिश्रण एकत्र करा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. आणि त्यामध्ये हे अंड्याचे मिश्रण घालून गरम करा. यानंतर कढईमध्ये तेल गरम करून नूडल्स सोबत सोया सॉस, हिरवी मिरची हे मिश्रण भाजून घ्या. साधारण पाच मिनिटानंतर या मिश्रणात तयार अंड्याच्या मिश्रणाला शिजवुन घ्या. आणि गॅस बंद करा. तुमचे टेस्टी नूडल्स तयार आहेत.

हेही वाचा: कडक सॅल्यूट! देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचा 'बेळगाव'ला मान; कर्नाटकाने राखली राष्ट्रप्रेमाची शान

२. चिली गार्लिक नूडल्स

साहित्य -

नुडल्स -250 ग्रॅम उकळलेले, कांदा-1 बारीक चिरलेला, लसुण कळ्या -7-8, सोया सॉस-1 चमचा, चिली सॉस-1/2 चमचा, पांढरा सिरका-1/2 चमचा, मीठ-चवीनुसार, काळी मिरची पाउडर-1/2 चमचा, हिरवी मिरची-2 बारीक चिरलेली, कोथंबिर-1 चमचा, तेल- 2 चमचे, साबुत लाल मिरची-2

कृती -

सुरुवातीला एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लाल मिरची, लसूण घालून फ्राय करा. यानंतर यामध्ये कांदा, सोया सॉस, चिली सॉस, आणि सिरका घालून ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये नूडल्स आणि काळी मिरची पावडर सोबत इतर सामग्री घालून काही वेळासाठी शिजवून घ्या. साधारण पाच मिनिट शिजल्यानंतर यामध्ये वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा. नूडल्स तयार आहेत.