esakal | कडक सॅल्यूट! देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचा 'बेळगाव'ला मान; कर्नाटकाने राखली राष्ट्रप्रेमाची शान

बोलून बातमी शोधा

null
कडक सॅल्यूट! देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचा 'बेळगाव'ला मान; कर्नाटकाने राखली राष्ट्रप्रेमाची शान
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : देशरक्षणासाठी योद्धे निर्माण करण्याचे केंद्र असलेल्या बेळगावात देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ आहे. त्यावर फडकणारा तिरंगा बेळगावच्या राष्ट्रप्रेमाची साक्ष देणारा आहे. या ध्वजस्तंभामुळे बेळगावची वेगळी ओळखही निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या शंभर कोटी विशेष निधीतून हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. तत्कालीन आमदार फिरोज सेठ यांची ही संकल्पना होती.

२०१८ मध्ये तत्कालीन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते पहिल्यांदा हा ध्वज फडकला. पण, पाऊस आणि वाऱ्यामुळे उंच ध्वजाचे वेळोवेळी नुकसान झाले. रोज ध्वज फडकवणे अवघड ठरले. त्यामुळे तत्कालीन महापालिका प्रशासकांनी विशेष परवानगी घेऊन तिरंग्याचा आकार कमी केला. तरीही अनेक वेळा ध्वजाचे नुकसान होऊ लागले. महापालिका प्रशासकांनी अखेर वर्षातून तीनवेळा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला. यात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन व कर्नाटक राज्योत्सव दिनाचा समावेश आहे. इतका मोठा निर्णय घेऊनही २०२० च्या प्रजास्तक दिनी ध्वज फडकला नाही.

हेही वाचा: International Dance Day : नसानसांत भिनलेल्या नृत्यामधून चैतन्यदायी ऊर्जा!

ध्वजस्तंभ नादुरुस्त झाल्याने अखेर हैदराबादमधून विशेष दुरुस्ती पथकाला पाचारण करण्यात आले. बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीकडे देखभालीचा ठेका असून आठ दिवस हे दुरुस्ती कार्य चालले. त्यानंतर २०२० चा स्वातंत्र्य दिन, राज्योत्सव व यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकला. बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री देशातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. त्यापाठोपाठ ज्युनियर लीडर्स विंग हे देशातील एकमेव कमांडो ट्रेनिंग सेंटर येथेच आहे. महार रेजिमेंटच्या प्रादेशिक सेनेच्या तुकडीसह वायु सैनिकांना प्राथमिक धडे देणारी एकमेव प्रशिक्षण संस्था बेळगावातच आहे.

निमलष्करी दलाच्या केंद्रीय राखीव पोलीस दल, कोब्रा कमांडो प्रशिक्षण तळ, चीन सीमेचे संरक्षण करणारी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांची बटालियन देखील कार्यरत आहे. तस्करी प्रशिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बेळगावला संरक्षण दलाने 'क्रेडल ऑफ इन्फंट्री' चा किताब बहाल केला आहे. अशा बेळगावात देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ असणे अभिमानाची बाब आहे.

हेही वाचा: झक्कास! उन्हाळी सोयाबीनचा वाळवा पॅटर्न; 100 एकरावर लागवड

देशातील पाच सर्वात उंच ध्वजस्तंभ

ठिकाण उंची (फुटात)

  • बेळगाव (कर्नाटक) ३६१

  • अत्तारी बॉर्डर (पंजाब) ३६०

  • पुणे (महाराष्ट्र) ३५१

  • गुवाहाटी (सिक्कीम) ३१९.५

  • कोल्हापूर (महाराष्ट्र) ३०३

बेळगावमधील ध्वजस्तंभ

  • ध्वजस्तंभाची उंची ः ३६१ मीटर

  • ध्वजाचा पहिला आकार ः ९,६०० चौरस फूट

  • ध्वजाचा आताचा आकार ः ५,४०० चौरस फूट

  • ध्वजाचे एकूण वजन ः ३५० किलो