आजची रेसिपी : समोसे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

साहित्य - (आवरणासाठी) मैदा - 100 ग्रॅम, जिरे - ½ चमचा, तेल - 1 चमचा, मीठ - चवीनुसार.

सारणासाठी साहित्य - कांदा -1 (बारीक चिरलेला), हिरवी मिरची -2-3 (बारीक चिरलेली), आल्याची पेस्ट - 1 चमचा, कोथिंबीर - गरजेनुसार, बटाटे - 4-5 (उकडलेले), हळद पावडर - ½ चमचा, धणेपूड - 1 चमचा, जिरे पावडर - 1 चमचा आणि तेल आवश्यकतेनुसार.

कृती - सर्वप्रथम मैदा, मीठ आणि थोडे तेल घेवून एका भांड्यात चांगले मिसळून थोडे पाणी घाला. त्याचा घट्ट गोळा बनवा. त्यात थोडा बेकिंग सोडा घाला. त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.

मसाला बनविण्याची कृती - बटाट्याची साले काढून चांगले बारीक चुरून घ्या. कढईत तेल घेवून त्यात कांदा, जिरे, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या तळूद्यात, करपू देवू नये. त्यात हा गर घाला. 2-3 मिनिटे होवू द्या. त्यात हळद, जिरे पावडर, मीठ घालून चांगले परता. त्यानंतर 5 मिनिटांनी काढून घ्या. थंड होऊ द्या. पुऱयांमध्ये ही भाजी भरा आणि समोस्याचा आकार देवून तयार करा. कढईत तेल घेवून त्यात हळूहळू समोसे तळण्यासाठी सोडा आणि तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा आणि चटणीसोबत गरमागरम खायला द्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: todayes recipe samose