आजची रेसिपी : कच्च्या केळीचे सामोसे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

1 कप मैदा, 2 ते 3 उकडून मॅश केलेली कच्ची केळी, 1 चमचा ओवा, 5 चमचे तेल, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा आमसूल पूड, 1 चमचा धनेपूड, हळद, तिखट, मीठ, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.

साहित्य - 1 कप मैदा, 2 ते 3 उकडून मॅश केलेली कच्ची केळी, 1 चमचा ओवा, 5 चमचे तेल, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा आमसूल पूड, 1 चमचा धनेपूड, हळद, तिखट, मीठ, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल. 

कृती - सर्वप्रथम मैद्यामध्ये तेलाचे मोहन, ओवा, मीठ घालून पाणी घालत घालत घट्ट मळून घ्यावे. या गोळ्याला 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे. 

सारणासाठी कृती - कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरेपूड, आलं लसूण पेस्ट, आमसूल पूड, मॅश केलेले केळी, हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 
 

सामोसे बनविण्याची कृती - आता या भिजवलेल्या कणकेचे बारीक गोळे करून घ्यावेत. मैद्याची पोळी लाटायची. पारी जास्त जाड किंवा बारीक नसावी. अगदी मध्यमसर लाटावी. आता त्या पोळीचे मधून काप करावेत. त्या कापाच्या वरील टोकाला पाणी लावून त्याला खालचे टोक जोडावे. आता त्याला त्रिकोणाकार बनवावे. त्यामध्ये सारण भरावे आणि पुन्हा सर्व बाजूच्या कडांना पाणी लावून चिकटवून घ्यावे. मग कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर तांबूस रंग येईपर्यंत सामोसे तळावे. चिंचेची चटणी किंवा हिरव्या चटणी सोबत गरमागरम खुसखुशीत सामोसे सर्व्ह करावेत. सोबत बारीक चिरलेला कांदा, तळलेली मिरची लज्जत वाढवते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: todays recipe banana samosa

Tags
टॉपिकस
Topic Tags: