
साहित्य -
१ कैरी, १ वाटी हरभरा डाळ, २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी-जास्त कराव्यात), मीठ चवीप्रमाणे. १ टी स्पून साखर, १/२ इंच आल्याचा तुकडा, फ़ोडणीपुरते तेल.
फोडणीचे साहित्य -
हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबी
साहित्य -
१ कैरी, १ वाटी हरभरा डाळ, २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी-जास्त कराव्यात), मीठ चवीप्रमाणे. १ टी स्पून साखर, १/२ इंच आल्याचा तुकडा, फ़ोडणीपुरते तेल.
फोडणीचे साहित्य -
हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती -
हरभरा डाळ थंड पाण्यात कमीतकमी २ ते ३ तास भिजत घालावी. कैरीची साल काढून त्याचे तुकडे करावेत किंवा सरळ कैरी किसून घ्यावी. हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत, आल्याची साल काढून त्याचे पण तुकडे करावेत. कैरी, डाळ, मीठ, आले, मिरची एकत्र करुन मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. कैरी किसलेली असेल, तर मिक्सरमधे बारीक न करता तशीच डाळीमध्ये मिसळली तरी चालते. साखर घालून सगळे एकत्र नीट मिसळून घ्यावे. तेलाची हिंग, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करुन डाळीवर घालत डाळ परत एकदा नीट मिसळून घ्यावी. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
टीप -
ही डाळ नुस्तीच खायला दिली तरी चालते. विशेषतः बालगोपालांना ती खूप आवडते. जेवताना पानाच्या डाव्या बाजूला वाढायलादेखील ही डाळ उपयोगी पडते.