साहित्य - ३/४ कप दूध, १ कप दही, ३/४ कप आंब्याचा रस (मी कॅनमधील रेडीमेड मँगो पल्प वापरला होता), ४ टे. स्पून साखर, १/४ टी स्पून वेलची पूड (ऐच्छिक), सजावटीसाठी बदाम, पिस्त्याचा भरडसर चुरा, केसर, पुदिन्याचे पान इच्छेनुसार.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कृती - दूध, दही, मँगो पल्प, साखर आणि वेलची पूड एकत्र मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावे. दोन सर्व्हिंग ग्लासमध्ये लस्सी ओतावी. वरून पिस्ता, बदामची पूड, केसर आदी घालून सजवावे. मँगो लस्सी फ्रिजमध्ये गार करावी आणि मग सर्व्ह करावी.
टीपा - १) रेडिमेड मँगो पल्पमध्ये बर्यापैकी साखर असते. म्हणून ४ टे. स्पून साखर वापरली आहे. घरी आमरस बनवून, तोही लस्सीसाठी वापरता येतो. भरपूर गर असलेले २ हापूस आंबे घ्यावेत. साल आणि आतील कोय काढावी. गर मिक्सरमध्ये बारीक वाटावा. जर गरामध्ये आंब्यातील तंतू असतील, तर रस गाळून घ्यावा आणि वरील कृतीप्रमाणे लस्सी बनवावी. आमरस घरी बनवल्याने लस्सीमध्ये साखर अजून घालावी लागेल. २) शक्यतो पूर्ण स्निग्धांश (फूल फॅट) असलेले दही वापरावे. घरी विरजले असल्यास उत्तम. किराणा दुकानामध्ये जे लो फॅट किंवा फॅट फ्री दही मिळते त्याचे टेक्स्चर कधीकधी गुळगुळीत असते. त्यामुळे लस्सी चांगली लागत नाही. ३) लस्सीचा पातळ-घट्टपणा आवडीनुसार ठेवावा. त्याप्रमाणे दुधाचे प्रमाण कमी किंवा जास्त ते ठरवावे.