आजची रेसिपी - रव्याचा डोसा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

१ कप रवा, ३/४ कप दही, १/२ कप पाणी, १/२ कप कांदा (बारीक चिरलेला), १/२ कप टोमॅटो (बारीक चिरून), २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १/२ टी स्पून जिरे, १/२ टी स्पून आलेपेस्ट, १/४ कप कोथिंबीर (बारीक चिरून) आणि, चवीपुरते मिठ, चिमूटभर बेकींग सोडा (खायचा सोडा) आणि १/४ कप तेल.

साहित्य - १ कप रवा, ३/४ कप दही, १/२ कप पाणी, १/२ कप कांदा (बारीक चिरलेला), १/२ कप टोमॅटो (बारीक चिरून), २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १/२ टी स्पून जिरे, १/२ टी स्पून आलेपेस्ट, १/४ कप कोथिंबीर (बारीक चिरून) आणि, चवीपुरते मिठ, चिमूटभर बेकींग सोडा (खायचा सोडा) आणि १/४ कप तेल.

कृती - १) दही आणि पाणी एकत्र करून घट्ट ताक बनवून घ्यावे. त्यात रवा घालून मिक्स करावे. गरज भासल्यास अजून थोडे ताक घालावे. मिश्रण पातळ नको आणि खूप घट्टदेखील नको. मिश्रण एक दीड तास झाकून ठेवून द्यावे.

२) एक दीड तासांनंतर त्यात कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलेपेस्ट, जिरे, कोथिंबीर, मिठ आणि बेकींग सोडा घालून मिक्स करावे.

३) नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून गरम करावा. तवा गरम झाला की १ डाव मिश्रण घालावे, फक्त पळीने पसरू नये. घावन जाडसरच ठेवावे. मिडीयम हाय फ्लेमवर तव्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. घावण एका बाजूने शिजले की थोडे तेल घालून त्याची दुसरी बाजू भाजून घ्यावी. घावण गरमच असताना खावे. नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Todays recipe ravyacha dosa