आजची रेसिपी : शेवयांचा उपमा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

शेवयांचा उपमा हा अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्‍ता आहे. हा उपमा बनवणंदेखील अतिशय सोपं आहे. तसंच अगदी कमी वेळात हा नाश्‍ता तयार होतो. त्यासाठी जास्त वेळ घालवण्याची गरज भासत नाही.

शेवयांचा उपमा हा अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्‍ता आहे. हा उपमा बनवणंदेखील अतिशय सोपं आहे. तसंच अगदी कमी वेळात हा नाश्‍ता तयार होतो. त्यासाठी जास्त वेळ घालवण्याची गरज भासत नाही. 

साहित्य - शेवया, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, वाटाणे, फरसबी, गाजर, कोथिंबीर, मिरची, चवीनुसार मीठ, फोडणीचं साहित्य.

कृती - एका भांड्यात पाणी घेऊन उकळवायला ठेवा. त्यात चार थेंब तेल घाला आणि शेवया शिजवायला ठेवा. पाणी उकळलं अर्थात शेवया शिजल्या की, पाणी काढून टाका. नंतर दुसऱ्या कढईत तेल घ्या. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घाला आणि मग कापलेला कांदा परतवा. मग तुम्हांला हव्या त्या भाज्या (जसे की, सिमला मिरची, वाटाणे, फसरणबी, गाजर) त्यामध्ये कापून घाला. वरून शेवया घाला. सगळे नीट मिक्‍स करून घ्या. त्यात थोडं पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्या. वरून मीठ आणि कोथिंबीर घाला. खाण्यासाठी उपमा तयार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: todays recipe shevayancha upama

Tags
टॉपिकस
Topic Tags: