आजची रेसिपी : ताकातली उकड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

साहित्य -
२ कप आंबट ताक, तांदळाचे पीठ, ३-४ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, ३-४ हिरव्या मिरच्या. 

फोडणीसाठी -
१/४ टी स्पून मोहोरी, १/४ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हिंग, १/२ टी स्पून हळद, ३-४ कढीपत्ता पाने, १ टे. स्पून तेल, मीठ, कोथिंबीर.

साहित्य -
२ कप आंबट ताक, तांदळाचे पीठ, ३-४ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, ३-४ हिरव्या मिरच्या. 

फोडणीसाठी -
१/४ टी स्पून मोहोरी, १/४ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हिंग, १/२ टी स्पून हळद, ३-४ कढीपत्ता पाने, १ टे. स्पून तेल, मीठ, कोथिंबीर.

कृती -
कढईमध्ये १ टे. स्पून तेल गरम करावे. तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालावेत. लसूण, आले ठेचून घालावे. सर्व व्यवस्थित परतले की ताक घालावे. ताकाला उकळी येईस्तोवर ढवळत राहावे, ज्यामुळे ताक फुटणार नाही. ताकाला उकळी आली की त्यात चवीपुरते मिठ घालावे आणि तांदळाचे पीठ वरून भुरभुरावे. गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कारण भराभर पीठ घातले तर हमखास गुठळ्या होतात. उकडीला जेवढा घट्टपणा हवा असेल तेवढे तांदळाचे पीठ हळूहळू घालत ढवळत राहावे. वाफ काढावी.

टीप-
अजून एका पद्धतीने उकड बनवता येते. ताक थेट फोडणीस न घालता, ताकात तांदळाचे पीठ घालून मध्यम दाटसर पेस्ट बनवून घ्यावी, मीठ घालावे. आणि ही पेस्ट फोडणीस घालावी आणि लगेच ढवळावे. यामध्ये गुठळ्या पटकन होतात, त्यामुळे थोडे दक्ष राहावे.

काहीजणांना एकदम घट्ट उकड आवडते. तशी उकड हवी असेल तर पिठाचे प्रमाण थोडे वाढवावे. उकडीची वाफ मुरली की गरम असतानाच तेलाने उकड छान मळून घ्यावी आणि मग खावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Todays Recipe Takatil Ukad

Tags
टॉपिकस
Topic Tags: