आजची रेसिपी : तूरडाळ पकोडा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

१ वाटी तूरडाळ, १ कांदा बारीक चिरून, ४ ते ५ लाल मिरच्या, ४ ते ५ कडीपत्ता पाने बारीक चिरून, १ इंच आल्याचा तुकडा खिसून, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल. गरजेनुसार, हिरवी मिरची, उभा चिरलेला बारीक कांदा.

साहित्य - १ वाटी तूरडाळ, १ कांदा बारीक चिरून, ४ ते ५ लाल मिरच्या, ४ ते ५ कडीपत्ता पाने बारीक चिरून, १ इंच आल्याचा तुकडा खिसून, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल. गरजेनुसार, हिरवी मिरची, उभा चिरलेला बारीक कांदा.

कृती - प्रथम तूरडाळ निवडून धुवून घ्यावी. नंतर किमान दोन तास पाण्यात भिजत ठेवावी. मिक्‍सर जारमध्ये लाल मिरची घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. नंतर जारमध्ये निथळलेली तूरडाळ घालावी. त्यातच लाल मिरचीची पूड घालून मिश्रण भज्याच्या पिठाप्रमाणे बनवून घ्यावे. आता तयार पीठ बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, आले, हिंग आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून पंधरा मिनिटे भिजण्यासाठी झाकून ठेवावे. आता गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. भज्याचे पीठ परत एकदा हातानेच मिक्‍स करावे. आच मंद करून भज्याचे पीठ गरम तेलात सोडावे. भजी हलक्‍या सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत झाली की, पेपरनॅपकीनवर काढावीत. म्हणजे जास्तीचे तेल त्या पेपरनॅपकीनमध्ये शोषले जाईल. आता तयार गरम तूरडाळ पकोडा चटणी अथवा केचअपसोबत खाण्यास द्यावे. गरज वाटल्यास त्यावर कांदा, लिंबू रस घालावा. सोबत तळलेली हिरवी मिरची असेल, तर बेत आणखी उत्तम होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: todays recipe turdal pakoda