
बटाटे उकडून ते स्मॅश करून घ्यावेत. त्यात उकडलेले गाजर आणि फरसबी घाला. त्यावर पातळ पोहे, तिखट, गरम मसाला अथवा छोले मसाला, मीठ घालून त्या सर्वांचे मिश्रण करा. त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. त्या गोळ्यांना हवा तसा आकार द्या, साधारणतः छोटे छोटे हातात मावतील, एवढ्या आकाराने ते बनवल्यास आकर्षक दिसतात.
साहित्य - उकडलेले बटाटे, उकडलेली फरसबी आणि गाजर, तिखट, पातळ पोहे, गरम मसाला अथवा छोले मसाला, बारीक रवा, मीठ आणि तेल.
कृती - बटाटे उकडून ते स्मॅश करून घ्यावेत. त्यात उकडलेले गाजर आणि फरसबी घाला. त्यावर पातळ पोहे, तिखट, गरम मसाला अथवा छोले मसाला, मीठ घालून त्या सर्वांचे मिश्रण करा. त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. त्या गोळ्यांना हवा तसा आकार द्या, साधारणतः छोटे छोटे हातात मावतील, एवढ्या आकाराने ते बनवल्यास आकर्षक दिसतात. गरजेनुसार त्यावर काजू पेरा. त्यानंतर मग ते शॅलो फ्राय करा. गरमागरम कटलेटवर कोथिंबीर घालून, समजून सॉस आणि चटणी यांच्यासह खायला द्या.