साहित्य - १ शिजलेला बटाटा, १/२ कप मटार, १/४ कप गाजराचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे, १ छोटा कांदा, १ टे. स्पून लसूण पेस्ट, ५ टे. स्पून चणा पीठ, ६-७ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार लाल तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १ टी स्पून चाट मसाला, १ टी स्पून आमचूर पावडर, १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ कप भाजलेला रवा, तेल, मीठ.

कृती -
१) मटार, गाजर, फरसबीचे तुकडे थोडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. सर्व भाज्या चाळणीत काढून ठेवाव्यात जेणेकरून त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट आणि मिरच्या बारीक करून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतला की त्यात चण्याचे पीठ घालावे, पीठ खमंग भाजून घ्यावे.
३) एका भांड्यात शिजलेला बटाटा किसून घ्यावा. त्यात सर्व वाफवलेल्या भाज्या, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ आणि भाजलेले चणा पीठ घालून एकत्र करावे. चणा पिठामुळे घट्टपणा येतो. पण कधी कधी बटाटा आणि इतर भाज्यांतील पाण्यामुळे जरा ओलसरपणा येण्याची शक्यता असते. तेव्हा गरज वाटल्यास ब्रेड घालावा.
४) मिश्रणाचे साहित्य भाग करून त्याला हाताने किंवा साच्याने आकार द्यावा. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करत ठेवावे. कटलेटला भाजलेला रवा दोन्ही बाजूने लावून घ्यावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन भाजून घ्यावे.