esakal | सावधान! टोमॅटो Ketchup खाताय? 'हे' आहेत धोके
sakal

बोलून बातमी शोधा

टोमॅटो  केचप

सावधान! टोमॅटो Ketchup खाताय? 'हे' आहेत धोके

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

टोमॅटो केचप हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यानांच आवडतो. काहींना तर केचपची इतकी सवय असते की, त्याच्याशिवाय जेवणच जात नाही. मॅगी, नुडल्स, पराठा, चायनिज फुड असेल तर केचप हा लागतोच. पण तुम्हाला हे माहित आहे का, की प्रमाणापेक्षा जर जादा केचप खाल्ला तर आरोग्याला हानीकारक असू शकतो. आज तुम्हाला या याविषयी माहिती देणार आहोत.

वाढणारी जाडी: अती केचअप खाणे हे वजन वाढीस कारणीभूत ठरते. शिवाय इन्सुलिनचे प्रमाण कमी होते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

अॅसिडिटी : टोमॅटो केचप अम्लीय असते. केचपमध्ये गोड आणि आंबट असे मिश्रण असते. ज्याचे जादा सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

किडनीची समस्या: टोमॅटो केचपचे अधिक सेवन केल्याने युरीनमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते.ज्यामुळे आपल्या किडनीवर परिणाम होतो. यामुळे स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते.

अॅलर्जी : जास्त टोमॅटो केचप खाल्ल्याने शरीरात अॅलर्जी होऊ शकते. कारण केचपमध्ये हिस्टामाईन्स केमिकलचे प्रमाण जास्त असते.

loading image
go to top