

Traditional Jowar Shengole Recipe
sakal
हिवाळा सुरू झाला की स्वयंपाकघरात गरमागरम आणि पौष्टिक पदार्थांची चव वेगळीच खुलते. थंड हवेत शरीराला उब देणाऱ्या या पदार्थांमध्ये एक पारंपरिक आणि आवडता पदार्थ म्हणजे – ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे. साधे, हलके आणि चविष्ट असलेले हे शेंगोळे घरच्या घरी पटकन तयार होतात आणि जेवणात खास उबदारपणा आणतात. मसाल्यांच्या चवीने भरलेले, सूपसारख्या रसात मऊसर शिजलेले हे पारंपरिक शेंगोळे हिवाळ्यातील जेवणासाठी अगदी परफेक्ट पर्याय आहे. एकदा बनवून पाहिलात तर त्याची साधी, पण घरगुती चव तुम्हाला नक्कीच भावेल.