esakal | भाजलेल्या कांद्यापासुन ते रायता बनवण्यापर्यंत; जाणून घ्या कुकिंगच्या काही ट्रिक्स

बोलून बातमी शोधा

भाजलेल्या कांद्यापासुन ते रायता बनवण्यापर्यंत; जाणून घ्या कुकिंगच्या काही ट्रिक्स
भाजलेल्या कांद्यापासुन ते रायता बनवण्यापर्यंत; जाणून घ्या कुकिंगच्या काही ट्रिक्स
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जर घरच्या खाण्यामध्ये कांदा नसेल तर चुकल्यासारखं वाटतं. साधारणतः 80 टक्के घरांमध्ये स्वयंपाकात कांद्याचा वापर होतो. आणि तो वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. परंतु यामध्ये एक समस्या आहे की कांद्याला भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो. जर तुम्ही ग्रेवीची भाजी बनवणार असाल, तर बऱ्याच वेळा कांद्याला भाजण्यास वेळ लागतो. त्यामुळे आज आपण कांद्याशी निगडीत काही कुकिंग ट्रिक्स पाहणार आहोत. या अशा ट्रिक्स आहेत ज्या कांद्यासोबत तुमचा स्वयंपाक सोपा करून देतील.

कांदा भाजण्यासाठी मीठ आणि साखरेचा करा वापर

कांदा भाजून घेण्यासाठी वेळ लागतो. अनेकजण बऱ्याच वेळा यामध्ये मीठ घालतात. परंतु परफेक्ट ब्राऊन कलर येण्यासाठी त्यामध्ये तुम्ही थोडी साखर घालू शकता. परंतु हे लक्षात ठेवा ही साखर घालत असताना त्यात मीठाचे प्रमाण ठेवा. भाजी शिजत असताना त्यामध्ये मिठाऐवजी थोडासा साखरेचा स्वाद हवा असल्यास तुम्ही यामध्ये टोमॅटोचा वापरही करू शकता.

कांदा उकळून बनवा भाजी मसाला

कदाचित ही ट्रिक ऐकून तुम्हाला थोडं वेगळं वाटेल. परंतु ही ट्रिक फायद्याची आहे. फक्त तुम्हाला इतकच कराव लागेल कांद्याचा मसाला कोणत्याही ग्रेव्ही भाजीत घालण्याआधी कांद्याला उकडून घेऊन डायरेक्ट कढईमध्ये स्मॅश केले पाहिजे. अजून एक ग्रेव्ही बनवण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल. आणि त्याचा फ्लेवर येईल. फक्त एकच लक्षात ठेवा कांद्याला जास्त उकळू देऊ नका. अन्यथा तो गोड होईल.

परफेक्ट फ्लेवरचा कांदा रायता बनवण्यासाठी वापरू शकता

परफेक्ट फ्लेवरचा रायता बनवण्यासाठी कांदा वापरला जातो. यामध्ये कांद्याला चिरून त्वरित त्यामध्ये जिरा पावडर मिक्स करा. आणि यामध्ये मीठ आणि फेटून दही घालायचे आहे. या फ्लेवरमध्ये कांदा अधिक क्रंची होईल. तसेच त्याच्या टेस्टबद्दल तुम्ही याच्या जागी भाजलेली जिरा पावडरही घालू शकता.

सिरकावाला कांदा बनवताना अशी घ्या काळजी

जर तुम्ही सिरका वाला कांदा बनवण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. यासाठी तुम्ही पांढरा कांदा वापरा. कांद्याला लाल रंग हा सल्फरमुळे येतो. त्यामुळे तुम्ही सिरका वाला कांदा बनवून ठेवा ठेवणार असाल, तर नेहमी सिरकाचा वापर करा. यासोबत तुम्ही मीठ आणि थोडी साखरही वापरू शकता.