TURICHYA DANYACHI KACHORI:हिरव्या तुरीच्या दाण्यांची खरपूस कचोरी कशी तयार करतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TURICHYA DANYACHI KACHORI

TURICHYA DANYACHI KACHORI : हिरव्या तुरीच्या दाण्यांची खरपूस कचोरी कशी तयार करतात?

आपल्या भारतीयांचे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणजे कचोरी. कचोरीला देशातील प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते. देशाच्या प्रांत बदलला की कचोरीचे सारण बदलते. आणि सारण बदल की कचोरीची चव देखील बदलते , आजच्या लेखात आपण विदर्भ स्पेशल हिरव्या दाण्यांची कचोरी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

तुरीच्या शेंगांचे ओले हिरवे दाणे २ वाटी

तिन मैदा  वाटी

अर्धी वाटी बेसन 

मीठ चवीनुसार

हिरवी मिरची

जिरेपूड  

आले एक तुकडा

लसूण पाकळ्या 

बडी शोप 

ओवा 

धनी

तेल

हळद 

हेही वाचा: Viral Video: खतरों का खिलाडी! पाण्यात राहून मगरीशी केली मैत्री

कृती:

प्रथम मैद्यामध्ये मीठ, ओवा टाकून एकत्र करणे. मग त्यात 5 चमचे कडकडीत तेलाचे मोहन टाकून एकत्र करावे. थंड पाण्याने गोळा सैलसर भिजवून अर्धा तास मुरण्यास ठेवणे. एका भांड्यात 4 चमचे तेल तापवून घेणे. त्यात मिरची, आले, लसूण यांची पेस्ट करून टाकणे. थोडी परतून घेणे. तुरीच्या दाण्यांची पेस्ट करून ह्यात टाकणे.

5 मिनिटे मंद गॅस वर परतणे. आता बेसन, हळद, बारीक केलेले धणे जिरेपूड, मीठ, शोप टाकून मंद गॅसवर चांगले परतून घेणे. बेसन लालसर झाले की थोडा पाण्याचा हबका मारावा व गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ द्यावे.

आता पोळीच्या गोळ्यापेक्षा थोडा छोटा गोळा घेऊन हातावर त्याची वाटी करून त्यात मिश्रण भरावे. गोळा चारही बाजूनी वरती आणत बंद करावा. आता किंचित मैदा लावून पोळपाटावर जाड लाटावे.

तेल कढईत तापत ठेवावे. तापल्यावर गॅस मंद करून एक कचोरी सोडावी. कचोरीला वरच्या बाजूने थोडासा दाब देत जावा. हळूहळू ती फुगत आल्यावर पलटावी. गॅस मंदच ठेवून दोन्ही बाजूनी खरपूस लाल होईपर्यंत तळावी. गरमागरम कचोरी दही, कांदा, बारीक शेव, कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी.