esakal | कुरकुरीत - चुरचुरीत : फोडणीच्या पाण्यातल्या चकोल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Chakolya

कुरकुरीत - चुरचुरीत : फोडणीच्या पाण्यातल्या चकोल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- उज्ज्वला कोपर्डेकर, पुणे

लग्नानंतर एकएक नवनवीन पदार्थ बनवायला मी शिकले. चकोल्या हा घरच्यांचा सगळ्यात आवडीचा पदार्थ. आठवड्यात एक-दोनदा तरी तो केला जाई. एकदा आम्ही बाहेरून फिरून आलो, उशीर झाला होता. सर्वांना भूक लागली होती. पटकन चकोल्या करण्याचे मी ठरवले. डाळ कुकरला लावली, कणीक भिजवून तयार ठेवली. पातेल्यात फोडणी केली. सर्वांना तर फारच भूक लागली होती. त्यामुळे सगळेजण घाई करत होते. मलाही टेन्शन आले.

पटकन् फोडणीत पाणी घातले व चपाती लाटून त्याचे सुरीने तुकडे करून उकळत्या फोडणीत टाकले, झाकण ठेवून त्या शिजू दिल्या. चकोल्या शिजल्याचे बघून सर्वांना वाढल्या. सोबत पापड व चटणीही होती. भूक लागल्याने सर्वजण खात होते. मी पण जेवले. मात्र, प्रत्येक जण म्हणत होता, की आजच्या चकोल्या वेगळ्या लागत आहेत. तरी सर्वांनी खाल्ल्या. जेवून मी आवराआवर केली. तेव्हा कुकर जड लागला. उघडून पाहिले, तर त्यात डाळ तशीच होती, त्यामुळे पाण्यात शिजवलेल्या चकोल्या सर्वांनी खाल्ल्या होत्या. नंतर सगळे जण हसत सुटले आणि अजूनही चकोल्याचा विषय निघाला, की आम्ही सारेच हसतो.

खाने मे ‘ट्विस्ट’

विशिष्ट पदार्थ आपण नेहमीच करतो; पण त्याला काही नवीन ट्विस्ट देण्याचेही प्रयोग अनेक जण करत असतात. मोदकाच्या आत वेगळं सारण घालणं असो, पिझ्झा पोषणयुक्त करण्यासाठी ‘स्टफिंग’मध्ये बदल करणं असो, किंवा अगदी फोडणी करतानाच्या पद्धतीत काही बदल असोत. तुम्ही असा काही ‘ट्विस्ट’ दिला असेल, तर त्या पदार्थाची रेसिपी आणि त्याबाबतचे कानमंत्र आणि काही सूचना असेल तर ती आम्हाला जरूर पाठवा. तुम्ही ‘ट्विस्ट’ दिलेल्या रेसिपीचा फोटो असेल तर उत्तम. हा ‘ट्विस्ट’ का दिला आणि त्यामुळे काय साध्य झालं हे मात्र जरूर सांगा, ज्यामुळे इतरांनाही काही प्रेरणा मिळेल. चला तर मग, लिहायला करा सुरुवात आणि पाठवा sugaran@esakal.com वर.

loading image
go to top