esakal | साबुदाणा खिचडी ऐवजी ही युनिक रेसिपी ट्राय करून पहा

बोलून बातमी शोधा

साबुदाणा खिचडी ऐवजी ही युनिक रेसिपी ट्राय करून पहा

साबुदाणा खिचडी ऐवजी ही युनिक रेसिपी ट्राय करून पहा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सणासुदीला केला जाणारा उपवास हे वजन वाढवण्यासाठी कारण ठरू शकते. यादरम्यान आपण अनेक गोड पदार्थ किंवा नमकीन पदार्थ खातो. त्यामुळे अनावश्यक वजन वाढू शकते. भारतीय चैत्र नवरात्र उत्सवाला हा 13 एप्रिलला सुरु झाला आहे. 21 एप्रिलला त्याची सांगता होणार आहे. या दिवसांत अनेकजण उपवास करतात. यादरम्यान सात्विक भोजन केले जाते. यात साबुदाण्याची खिचडी ही सर्वात लोकप्रिय आहे. साधारणत: याला सरळ आणि हलका आहार मानला जातो. परंतु यामुळे कार्ब्सचे अतिरिक्त सेवन होऊ शकते. परंतु यासाठी आमच्याकडे एक उपाय आहे. आम्ही अशी युनिक खिचडीची रेसिपी सांगणार आहोत ज्याचा स्वाद एकसारखाच असेल. अशी खास आणि स्वादिष्ट रेसिपी आपण आज पाहणार आहोत. ज्याचं नाव आहे कीटो फ्रेंडली साबुदाणा खिचडी. चला तर याची सोपी रेसिपी पाहूयात...

कृती -

एका पॅनमध्ये हे तूप गरम करून घ्या. त्यामध्ये जिरा टाका. परंतु ती फोडणी करपू देऊ नका. त्यानंतर यामध्ये शेंगदाणे टाकून सुगंध येण्यासाठी कढीपत्ता टाका. सोबतच पनीरची ट्यूब टाका. थोडा वेळ शिजवून घ्या. कढईमध्ये किसलेला नारळ मंद आचेवर शिजवून घ्या. त्यानंतर नारळाचे दूध काढून घ्या. ते शिजु द्या. त्यानंतर यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाका आणि हे दूध पूर्णपणे शिजवून घ्या. त्यानंतर हे दूध आणि खिचडी तुम्ही एकत्र घेऊन खाऊ शकता.