esakal | घरी चपात्या बनवताना वापरा 'या' टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

roti

घरी चपात्या बनवताना वापरा 'या' टिप्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: आपल्याला सर्वांना रोज जेवणात ताज्या चपात्या मिळाल्या तर त्या जास्त खाल्ल्या जाऊ शकतात. जर चपाती चांगली भाजली असेल तर ती खाण्यात अजून मजा आहे. बऱ्याच जणांकडून चपाती करपते किंवा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी येतात (mistakes while setting curd). चपाती बनवताना ती व्यवस्थित फूगली आणि भाजली तर ती खायला बरी लागते. चला तर मग आज समजून घेऊया चपाती बनवताना कोणती काळजी घेतल्यास चपाती उत्तम बनते.

१) कणीक मळताना कोमट पाण्याचा वापर करा-

चपात्यासाठी पीठ मळताना पाणी कोमट घ्यावे. चपात्या मऊ होण्यास याचा मोठा फायदा होतो. तसेच कणीक मळताना त्यात तुम्ही अर्धा चमचा तेलही टाकू शकाल, पण कोमट पाण्याचा वापर नक्की करावा. (use-this-esay-trick-when-curd-does-not-set-properly)

२) पीठ मळल्यानंतर लगेच चपात्या करू नये-

चपात्या करताना घाई करू नका. कणीक मळल्यानंतर ती कमीतकमी 10 मिनिटे झाकून ठेवा. कणीक मळल्यानंतर ती काही वेळ ठेवणे चांगले आहे पण ती पाच ते सात मिनीटे ठेवू शकता (curd amazing uses).

३. चपात्या तव्यावर टाकताना त्यावर लावलेले पीठ झाडून टाका. असं नाही केल्यास वर लागलेले पीठ करपते. यामुळे चपाती काळी दिसते. यामुळे चपात्या बनवताना पीठ झाडून टाका.

४) कणीक बंद डब्यात ठेऊन फ्रिजमध्ये ठेवू नये. तसे केल्यास कणीक काही प्रमाणात खराब होऊन चपात्या बिघडतात. तसेच चपात्या चवही लागत नाहीत. तसेच २४ तासांनतर कणीक पुन्हा वापरू नये.