
गाजर, मटार, स्वीट कॉर्न, सिमला मिरची घालावी. पाव वाटी दही घालून सर्व एकत्र करावे. थोडे पाणी घालून नेहमीच्या अप्प्यांचे पीठ करतो इतपत पातळ करावे. १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावे.
साहित्य - १ वाटी बांबिनो शेवया, पाऊण वाटी रवा, कांदा, वाटलेली हिरवी मिरची, जिरे पूड, धना पूड, मीठ, हिंग, हळद, आवडीप्रमाणे गाजर, मटार, स्वीट कॉर्न, सिमला मिरची, पाव वाटी दही.
कृती - प्रथम दोन चमचे तेल गरम करावे त्यात शेवया भाजाव्यात. नंतर त्यात रवा घालून तो ही भाजावा. थोडेसे भाजून झाले की, एका बाऊलमध्ये काढावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ, हळद, हिंग, धना-जिरा पूड घालावी. आवडीप्रमाणे गाजर, मटार, स्वीट कॉर्न, सिमला मिरची घालावी. पाव वाटी दही घालून सर्व एकत्र करावे. थोडे पाणी घालून नेहमीच्या अप्प्यांचे पीठ करतो इतपत पातळ करावे. १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावे. नंतर नेहमीप्रमाणे आप्पे करावेत.
- वैजयंती हिंगे, निगडी प्राधिकरण, पुणे