
vegan kabab recipe: चातुर्मास ६ जुलैपासून सुरू झाला असून हा हिंदू धर्मातील पवित्र काळ आहे. ज्यामध्ये अनेकजण मांसाहार, लसूण आणि कांदा टाळतात. अशा वेळी सात्त्विक आणि स्वादिष्ट पदार्थांची गरज भासते. जर तुम्ही पावसाळ्यात घरीच चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर व्हेगन कबाब हा उत्तम पर्याय आहे. लसूण आणि कांदा न वापरता, घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्याने तुम्ही झटपट व्हेगन कबाब बनवू शकता. ही रेसिपी सोपी, आरोग्यदायी आणि घरातील सर्वांना आवडेल. चातुर्मासात सात्त्विक आहाराला प्राधान्य देताना, हे कबाब तुमच्या जेवणाला चव आणि पोषण दोन्ही प्रदान करतात. विशेष म्हणजे, यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि साहित्यही सहज उपलब्ध आहे. चला, जाणून घेऊया घरच्या घरी व्हेगन कबाब बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.