

Vegetarian Club Sandwich Recipe & Steps
esakal
Simple Vegetarian Club Sandwich Recipe: घाईच्या वेळेत नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी काहीतरी खमंग, पौष्टिक आणि झटपट तयार होणारे हवे असल्यास व्हेजिटेरियन क्लब सँडविच हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पारंपरिक क्लब सँडविचमध्ये ब्रेडच्या थरांमध्ये शिजवलेले मांस, लेट्यूस, भाज्या आणि मेयोनीज असते; मात्र या शाकाहारी प्रकारात बटाट्याचे काप, परतून घेतलेल्या ताज्या भाज्या आणि आवडीचा स्प्रेड वापरून समृद्ध चव साधता येते.
इच्छेनुसार बटाट्याऐवजी पनीर, टोफू, सोया चाप किंवा टेम्पे वापरता येते. तसेच कोबी, कांदा, ढोबळी मिरची आणि गाजर यांसारख्या भाज्यांचा वापर केल्याने सँडविचला रंगतदार स्वरूप आणि कुरकुरीतपणा येतो.