Vidarbha Special Recipe: गावरान तुरीच्या सोल्याची आमटी कशी तयार करायची?

दिवाळी संपली की विदर्भात तुरीच्या शेंगा यायला लागल्या की घरोघरी तुरीच्या शेंगाच्या वेगवेगळ्या प्रकारे खाण्यावर चांगलाच जोर असतो
Vidarbha Special Recipe
Vidarbha Special RecipeEsakal

दिवाळी संपली की विदर्भात तुरीच्या शेंगा यायला लागल्या की घरोघरी तुरीच्या शेंगाच्या वेगवेगळ्या प्रकारे खाण्यावर चांगलाच जोर असतो, मग त्याच्या तुरीच्या दाण्याचा भात, तुरी दाणे घालुन फोडणीची खिचडी असो का तुर दाण्याची उसळ आमटी किंवा तुरीच्या उकडलेल्या शेंगा असे नानाविध प्रकार घरोघरी महिला मंडळी करतांना दिसतात.

खायला रूचकर लागणारे आणि पौष्टिक असणारे गावरान तुरीच्या कोवळ्या दाण्यांची आमटी कशी करतात याची सविस्तर रेसिपी आज आपण या लेखात पाहणार आहोत आहोत.

साहित्य 

1) एक वाटी सोललेले तुरीचे दाणे

2) एक मोठा कांदा 

3) ओलं खोबरं

4) हिरवी मिरची

5) लसूण पाकळ्या

6) कोथिंबीर

7) हळद

9) लाल तिखट

10) जिरं

11) मोहरी

12) काळा मसाला

13) मीठ 

14) तेल

Vidarbha Special Recipe
Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने बाजरीचा खिचडा कसा तयार करायचा?

कृती:

एका कढईत थोडंसं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात कांदा, लसूण आणि मिरची घाला. मध्यम आचेवर चांगलं परता. कांदा लालसर व्हायला लागला की त्यात तुरीचे दाणे घाला. नीट हलवा आणि झाकण घालून मंद आचेवर ठेवा. मधूनमधून हलवत रहावे. तुरीचे दाणे भाजले आले की ओलं खोबरं घालावे आणि परता. दोन मिनिटं परतून त्यात कोथिंबीर घालावी. अजून दोन मिनिटं परता आणि गॅस बंद करावा. परतलेलं मिश्रण थंड होऊ द्यावे. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यावे. वाटलेलं मिश्रण एका पातेल्यात काढावे. आपल्याला आमटी जितपत पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घाला. पातेलं गॅसवर ठेवून आमटी उकळत ठेवावी. त्यात आपल्या आवडीनुसार मीठ, काळा मसाला घालावे.

Vidarbha Special Recipe
Recipe: खायला चवदार लागणारी फणसांची मसाल्याची भाजी कशी तयार करायची?

एका लहान लोखंडी कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी घालून तडतडू द्यावी. मोहरी तडतडली की त्यात लगेचच हळद, तिखट घालून गॅस बंद करा. फोडणी खमंग झाली पाहिजे पण जळता कामा नये.ही फोडणी वरून आमटीवर ओता. हलवून आमटी पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा. तुरीच्या दाण्यांची आमटी तयार आहे.ही आमटी गरम भाकरी किंवा गरम भाताबरोबर तूप घालूनही उत्तम लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com