Viral Video: गुलाबजाम आवडतो? मग स्वतःच्या रिस्कवर पाहा हा व्हिडीओ

अनेकांना गुलाबजामून खूप आवडतं.
Gulab Jamun chaat
Gulab Jamun chaatesakal
Summary

अनेकांना गुलाबजामून खूप आवडतं.

गुलाब जामुनला (Gulab Jamun) 'किंग ऑफ स्वीट्स'असेही म्हणतात. अनेकांना गुलाबजामून खूप आवडतं. लग्न असो वा समारंभ, बऱ्याचठिकणी गुलाबजामुन बनवलाच जातो.प्रत्येक मिठाईच्या दुकानात तुम्हाला गुलाबजामुन दिसतील. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक दुकानदार तुमच्या आवडत्या गुलाबजामुनवर अत्याचार करताना दिसत आहे.

गुलाबजाम चाट बनवतोय दुकानदार-

गुलाबजामुनचा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हाला दुकानदारावर रागही येऊ शकतो. याशिवाय व्हिडिओ पाहून गुलाबजामुनमुळे तुमची चिडचिड होऊ शकते. या व्हिडीओमध्ये एक दुकानदार गुलाबजामुनसोबत असा प्रयोग करतोय, जो पाहून तुम्ही गुलाबजामुन खाणं कायमचं बंद करू शकता. खरं तर हा दुकानदार गुलाबजामुन चाट तयार करण्याचा व्हिडिओ बनवतो. जे खरंच विचित्र दिसतंय.

ही विचित्र डिश बनवण्यासाठी दुकानदार गोड आणि आंबट चटणीसोबत गुलाबजामूनमध्ये शेव वगैरे वापरतोय, असं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ही डिश गोड आणि खारटही आहे. इंशान शर्मा नावाच्या एका फूड ब्लॉगरने आपल्या टँग ट्विस्टर या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात रस्त्याच्या कडेला एक खाद्यपदार्थ विक्रेता गुलाबजामुन चाट (Gulab Jamun Chaat) बनवताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुकानदार पहिले चार गुलाब जामून प्लेटमध्ये ठेवतो. यानंतर त्यावर दही, गोड चटणी, आंबट चटणी, नमकीन, पापडी इत्यादी पदार्थ घालतो. आता गुलाबजामुन चाट तयार झाली आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले, 'ही डिश बनवण्याची काय मजबुरी आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com