विरुद्ध आहार : हेल्दी राहण्यासाठी 'हे' पदार्थ एकत्र खाणे टाळा

निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्यायला हवे.
विरुद्ध आहार : हेल्दी राहण्यासाठी 'हे' पदार्थ एकत्र खाणे टाळा

"तुम्ही जे खाता तेच तुम्ही आहात" असे म्हणतात ते अगदी खरे आहे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय खाता याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे. काही असे पदार्थ आहेत जे चुकूनही एकत्र खाऊ नये कारण त्यामुळे तुमच्या आतड्यावर परिणाम होऊ शकतो आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतो.

आयुर्वेदानुसार, प्रत्येक पदार्थामध्ये वेगळी उर्जा, चव असते आणि शरीरावर त्याचा वेगळा प्रभाव पडतो. त्यामुळे काही पदार्थ एकत्र खाण्यापूर्वी तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे. आयुर्वेदिक डॉक्टर दिश्रा भावसार यांनी कोणते पदार्थ एकत्र खाणे टाळले पाहिजेत हे सांगणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर केला

''विरुध्द आहार आहार म्हणजे असे खाद्य पदार्थ ज्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध गुणधर्म(मासे आणि दुध) आहेत; काही पदार्थ एकत्र खाल्यास ज्यांचा उतींवर( tissues) विरुद्ध प्रभाव ( फळे आणि दुध) पडतो; विशिष्ट प्रकारे(गरम केल्यावर मध) एखादा पदार्थाचे सेवन केल्यास शरीरावर नको असलेला परिणाम होऊ शकतो; विशिष्ट प्रमाणामध्ये( सम प्रमाणात शुद्ध मध आणि तुप एकत्र) काही पदार्थ एकत्र खाल्यास नको असलेले परिणाम होऊ शकतात; चुकीच्या वेळेला काही पदार्थ जे चुकीच्या वेळेला एकत्र खाल्यास त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.'' असे डॉक्टर भावसार यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

मासे आणि दुध - Milk and fish :

मासे आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये कारण हे दोन्ही पदार्थ एकमेकांशी विसंगत आहेत. दूध हे थंड असते तर मासे उष्ण असतात. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास अशुद्ध रक्त निर्माण होते आणि त्यामुळे रक्तवाहिण्यांमध् अडथळा निर्माण होऊ शकतो. (त्याला srotas म्हणतात)

मीठ आणि दूध हे दोन्ही पदार्थंमध्येही परस्परविरोधी गुणधर्म असल्यामुळे देखील एकत्र खाऊ नये असेही डॉ. भावसार यांनी सांगितले.

फळे आणि दूध (Fruits and milk)

केळ आणि दूध, दही, किंवा ताकासोबत कधी पदार्थ एकत्र खाऊ नये कारण त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि शरीरामध्ये विष निर्माण होऊ शकतो. हे पदार्थ एकत्र खाल्यास सर्दी, कफ आणि अॅलर्जी होऊ शकते.

गरम मध (Heated honey)

मध गरम केल्यामुळे पचनक्रियेमध्ये मदत करणारे एन्झाइम नष्ट होते त्यामुळे शरीरात विष निर्माण होते.

मध आणि तूप सम प्रमाणात एकत्र सेवन केल्यास - (Equal quantities of ghee and honey)

तूप आणि मधाचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा आहे त्यामुळे कधीही हे पदार्थ समप्रमाणात एकत्र खाऊ नये. मधामध्ये उष्णता, कोरडेपणा असतो आणि तूप थंडावा, मॉइश्चरायझिंग हे गुणधर्म असतात

''जेव्हा तुम्ही तूप आणि मध एकत्र सेवण करता तेव्हा दोन्हीपैकी एक पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असावा.'' असेही डॉ. भावसार त्यांनी सुचविले

रात्रीच्या वेळी दही खाणे (Eating curd at night)

दही(चीज, कॉटेज चीज) हे पदार्थ थंडीत खाणे आरोग्यासाठी खाणे चांगले आहे पण हे पदार्थ रात्रीच्यावेळी खाऊ नये. आयुर्वेदिक ग्रंथ करक-संहिता (सूत्र 225-227) नुसार, शरद ऋतूमध्ये, उन्हाळ्यात आणि वसंत ऋतूमध्ये दही खाणे टाळावे.

"जळजळ कमी करण्यासाठी, त्वचेचे विकार टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी चुकीचे आणि विसंगत अन्न एकत्र खाणे टाळा" असा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टर देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com