

Weekend special coriander potato vadi recipe:
Sakal
विकेंडला रोजच्या धावपळीपासून थोडा ब्रेक मिळतो आणि अशावेळी नाश्त्यात काहीतरी खास, चवदार अन् घरच्यांना आवडेल असं बनवावंसं वाटतं. नेहमीच्या पोहे, उपमा किंवा ब्रेड-बटरला कंटाळा आला असेल, तर कोथिंबीर आणि किसलेला बटाटा घालून चवदार वडी तयार करु शकता. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला खूप सोपी असून फारसा वेळही लागत नाही. कमी साहित्यांत तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. चहा किंवा दहीसोबत ही वडी नाश्त्यात दिली तर विकेंडची सुरुवात आणखी आनंददायी होते. ही वडी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.