Vat Purnima 2023 : उपवासाला चालणारा; घराघरात आवडणारा साबुदाणा परदेशातून भारतात कसा आला?

या साबुदाण्याने इतिहासात हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत.
Sabudana latest marathi news
Sabudana latest marathi newsesakal

३ जून रोजी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या सौभाग्यासाठी उपवास करतात. उपवासासाठी बहुतांश ठिकाणी साबुदाण्याची खिचडी, वडे, थालिपीठ खाल्ले जातात. हा साबुदाणा आला कुठून? य़ा साबुदाण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या...

सणासुदीच्या दिवसात, उपवास, व्रतांच्या दिवसात साबुदाण्याचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. पण हा साबुदाणा भारतीय नाही, तर तो ब्राझील आणि चीनमधून भारतात आला आहे. तो भारतात कसा आला, त्याचा इतिहास काय आहे, याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sabudana latest marathi news
Vat Purnima 2023 : पौर्णिमा नक्की कधी? ३ जून की ४ जून? जाणून घ्य़ा मुहुर्त व महत्त्वाच्या वेळा

कसा बनतो साबुदाणा?

साबुदाण्यात स्टार्चसोबत भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. द बेटर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, साबुदाणा टॅपिओका किंवा कसावा रूट किंवा कसावा मुळांपासून बनविला जातो. साफसफाई करून याचा चुरा केला जातो. यातून दुधासारखा द्रव बाहेर पडतो.

यातील सर्व घाण काढून टाकल्यावर तो घट्ट होतो आणि यंत्राच्या साहाय्याने याला गोल आकार दिला जातो. यानंतर ते वाफवले, भाजले आणि वाळवले जाते. इतर काही स्टेप्सनंतर याचे रुपांतर साबुदाण्यात होते.

उपासमारीच्या काळात वाचवले अनेकांचे जीव

टॅपिओका ब्राझीलमध्ये आढळतो. चीनमध्ये अनेक वर्षांपासून साबुदाणा अन्नात वापरला जात होता. पण भारतात त्याचा वापर सर्वात आधी केरळमध्ये झाला. १८०० साली केरळच्या त्रावणकोर इथं उपासमारी होत होती. यामुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या परिस्थितीमुळे राजा अयल्यम थिरुनल रामा वर्मा आणि त्याचा छोटा भाऊ विशाखम थिरुनल महाराज काळजीत पडले.

Sabudana latest marathi news
Vat Savitri Katha 2023 : सावित्रीने शक्कल लढवून असा वर मागितला की यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले!

विशाखम हे वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी उपासमारीवर उपाय म्हणून साबुदाण्यातल्या टॅपिओकाबद्दल सुचवलं. त्याची तपासणी केली आणि विशिष्ट पद्धतीने शिजवून ते खाल्लं जाऊ शकतं, असंही सांगितलं. नागरिकांना उपासमारीपासून वाचण्यासाठी हा पदार्थ खाण्याचंही आवाहन केलं. मात्र हा पदार्थ परदेशी असल्याने त्याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये भीती होती.

त्यामुळे अखेर राजाने शाही भोजनामध्ये या पदार्थाचा समावेश केला. लोकांना पटवून देण्यासाठी राजाने सर्वात आधी हा पदार्थ खाल्ला. त्यानंतर लोकांना यामध्ये कोणताही धोका नाही हे पटलं आणि नागरिकांनी याचं सेवन केलं. त्यामुळे उपासमारीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या करोडो नागरिकांचे जीव वाचले. सुरूवातीला केरळमध्ये याला कप्पा म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हळूहळू हा पदार्थ संपूर्ण भारतात पसरला. साधारण १९४० नंतर प्रक्रिया केलेला साबुदाणा चीनमधून आयात करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com