esakal | यंदा बाप्पाला दाखवा गव्हाच्या शिऱ्याचा नैवेद्य; जाणून घ्या सोप्पी कृती
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा बाप्पाला दाखवा गव्हाच्या शिऱ्याचा नैवेद्य

यंदा बाप्पाला दाखवा गव्हाच्या शिऱ्याचा नैवेद्य

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोणताही सणवार आला की प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ हमखास केले जातात. त्यातच शिरा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ त्यामुळे अनेक घरांमध्ये कायमच शिरा केला जातो. यामध्येच आता बदामाचा शिरा, रव्याचा शिरा, गव्हाच्या पीठाचा शिरा आवर्जुन केला जातो. परंतु, तुम्ही कधी गव्हाची खीर किंवा शिरा ट्राय केला आहे का? अतिशय पौष्टिक असलेला गव्हाचा शिरा/खीर चवीलादेखील तितकाच छान लागते. त्यामुळेच हा शिरा घरी कसा करायचा ते पाहुयात. (Wheat-puddings-gavachi-kheer-recipes)

साहित्य -

गव्हाचा रवा - पाव किलो ( कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतो.)

गुळ - पाव किलो

दूध - पाव लिटर

जायफळ - आवश्यकतेनुसार

खसखस - २ टी स्पून

वेलची पूड - १ टी स्पून

ड्रायफ्रुट्स - आवडीनुसार

पाव तुकडा जायफळ

खोवलेला ओला नारळ - अर्धी वाटी.

कृती -

प्रथम गव्हाचा रवा स्वच्छ धुवा घ्या आणि कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. रवा शिजल्यावर एका पातेल्यात काढा आणि मंद आचेवर ठेवा. आता या रव्यात गूळ, खोबरे, वेलची पूड, खसखस, जायफळ पूड घाला आणि छान मिक्स करुन घ्या. गूळ पूर्ण विरघळल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यावर ओलं खोबरं व ड्रायफ्रुट्स घाला. त्यानंतर झाकण लावून काही वेळ तसाच ठेवा.

loading image