

Matar Dhokla Recipe:
Sakal
Matar Dhokla Recipe: नेहमीचाच ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल, तर हिवाळ्यात मटार ढोकळा नक्की ट्राय करा. हिरव्या मटारांचा गोडसर स्वाद, मऊसर पोत आणि हलकं-फुलकं बनवण्याची पद्धत यामुळे हा ढोकळा घरातल्या प्रत्येकाचा फेव्हरेट ठरतो. थंडीच्या दिवसांत बाजारात ताज्या मटार सहज उपलब्ध असतात आणि त्यांच्यातील प्रथिने, फायबर व जीवनसत्त्वं शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरतात. मटार ढोकळा हा पारंपरिक ढोकळ्यापेक्षा वेगळा, अधिक पौष्टिक आणि चवीला खास असतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या फराळासाठी हा ढोकळा एकदम परफेक्ट पर्याय आहे. हा ढोकळा कमी वेळेत तयार होतो. मटार ढोकळा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.