

aliv ladoo
Sakal
हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे शरीराची ताकद कमी होते, रोगप्रतिकारशक्तीही कमजोर होते. अशा काळात आहारात पौष्टिक आणि उष्णता देणारे पदार्थ असणे अत्यंत गरजेचे असते. आळीव लाडू हा पारंपरिक हिवाळी पदार्थ केवळ चवीला छानच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो. आळीव म्हणजेच हळीव किंवा अलिव बिया या आयुर्वेदात शक्तिवर्धक मानल्या जातात. या बियांमध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे थकवा कमी होतो, शरीराला उर्जा मिळते आणि पचनशक्ती सुधारते. महिलांसाठी आळीव लाडू खूप उपयुक्त मानले जातात. थंडीच्या दिवसांत रोजच्या आहारात एक आळीव लाडू घेतल्यास शरीर उबदार राहते आणि सर्दी-खोकल्यासारख्या त्रासांपासून संरक्षण मिळते. घरच्या घरी हे लाडू कसे बनवायचे हे जाणून घऊया.