Winter Recipe: हिवाळ्यात ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

हिवाळ्यात आरोग्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे लाडू खूप प्रसिद्ध असतात.
Ajwain Ladoo Recipe
Ajwain Ladoo Recipe Esakal

Ajwain Ladoo Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे लाडू खूप प्रसिद्ध असतात. हिवाळा सुरू झाला गोंड-कडू लाडूंची पर्वणी असते. यातील एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे ओव्याचे लाडू. हे लाडू खायला जेवढे चविष्ट असतात तेवढेच ते शरीराला ऊर्जाही देतात. हे लाडू प्रामुख्याने थंडीच्या मोसमात खाल्ले जातात. कारण या ऋतूत आपली पचनशक्ती मजबूत बनते आणि हे लाडू सहज पचवता येतात.चला तर मग आजच्या लेखात पाहू या हिवाळ्यात ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? याची सविस्तर रेसिपी...

साहित्य 

1) 200 ग्रॅम ओवा

2) दोन वाटी गव्हाचे पीठ

3) अर्धा वाटी बदाम

4) अर्धा वाटी पिस्ता 

5) अर्धा वाटी अक्रोड

6) भोपळ्याच्या बीया

7) अर्धा वाटी काजू

8) एक चमचा वेलची पावडर 

9) एक चमचा हळद पावडर

10) जायफळ पावडर

11) पाव वाटी खसखस 

12) 50 ग्रॅम डिंक

13) तिन वाटी गूळ

14) खिसलेले सुके खोबरे

15) मखाने

16) तूप

Ajwain Ladoo Recipe
Winter Recipe: हिवाळ्यात शरीराला हेल्दी ठेवणारा स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स कसा तयार करायचा?

कृती:

ओव्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वातआधी एक जड तळाची कढाई घ्यावी. गॅसवर ठेवून तूप गरम करा. तूप वितळल्यावर त्यात डिंक घालून मध्यम आचेवर तळून घ्या. डिंकाचा रंग गोल्डन ब्राऊन झाला की गॅस बंद करा. डिंक बाहेर काढा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. थोडा थंड झाल्यावर डिंक कुस्करून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता कढईत तूप पुन्हा गरम करून त्यात गव्हाचे पीठमध्यम आचेवर भाजून घ्यावे.

पीठ भाजताना सतत ढवळत राहा, जेणेकरून ते जळणार नाही. पीठाचा रंग हलका तपकिरी व्हायला लागला की त्यात ओवा,बदाम,पिस्ता,अक्रोड,काजू,सुके खोबरे,मखाने मंद आचेवर परतून घ्यावे. आता हे मिश्रण पॅनमधून काढून थंड होऊ द्यावे आणि त्यात डिंक व गूळ टाकून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. आता या मिश्रणात जायफळ पावडर भोपळ्याच्या बीया खसखस हळद पावडर वेलची पावडरटाकून पुन्हा एकदा मिश्रण चांगले मिक्स करा आणि या मिश्रणाचे लाडू बनवा. सर्व मिश्रणाचे एक एक करून लाडू बनवा. अशा प्रकारे तुमचे चविष्ट आणि हेल्दी  ओव्याचे लाडू तयार आहेत. थंडीमध्ये रोज एक लाडू खाल्ल्याने शरीराची ताकद वाढण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com