Winter Recipe: पौष्टिक बीटरुटचे लाडू कसे तयार करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Recipe

Winter Recipe: पौष्टिक बीटरुटचे लाडू कसे तयार करायचे?

Beetroot ladoos: हिवाळ्याची थंडी सुरू झाली की मग घरोघरी मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, गुळ शेंगदाणा लाडू केले जातात पण बीटरूट पासून बनवलेल्या लाडू तुम्ही कधी खाल्ले का?काही लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे लाडू हिवाळ्यात आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. बीटरूटमध्ये भरपूर फोलेट (व्हिटॅमिन बी9) असते जे पेशी वाढण्यास आणि चांगले कार्य करण्यास मदत करते.

रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यात फोलेट देखील महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका (Risk of stroke) कमी होतो. त्यात नैसर्गिकरित्या नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते, जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. ज्या लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यांना बीटच्या रसाच्या सेवनाने जलद फायदे मिळू शकतात. बीटरूटचे सेवन केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून पौष्टिक बीटरुटचे लाडू कसे तयार करायचे..

साहित्य 

● बीटरूट (किसलेले) अडीच वाटी

● खवा (किसलेले) एक वाटी

● मिल्क पावडर एक वाटी

● साखर एक वाटी

● वेलची पूड 

● काजू बदाम पिस्ता एक वाटी

हेही वाचा: Winter Recipe: जवसची खमंग चटणी कशी तयार करायची?

कृती :

सर्वप्रथम लाडू बनवण्यासाठी सर्व प्रथम एका जाड तळाच्या पॅनमध्ये दोन कप पाणी गरम करावे. त्यात किसलेले बीटरूट, साखर, वेलची टाकावी. साखर वितळली की गॅस कमी करून शिजवा. ओलावा सुकल्यावर पॅन गॅसवरून खाली उतरवून ठेवा आणि मिश्रण थंड होऊ द्यावे. यानंतर भाजलेला खवा, मिल्क पावडर, काप केलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करावे. या मिश्रणापासून हव्या त्या आकाराचे लाडू बनवाहे लाडू चवीला जेवढे टेस्टी आहेत तेवढेच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूट खायचा कंटाळा करणारे लोक सुद्धा हे लाडू चवीने खातील.