Matar Kachori Recipe: खायला खमंग खरपुस मटर कचोरी घराच्या घरी कशी तयार करावी?

हिवाळा आला की बाजारात मटार उपलब्ध होतात. हे गोड चवीचे वाटाणे जेवणात मिसळले की जेवणाची चवही अप्रतिम होते.
Matar Kachori Recipe
Matar Kachori RecipeEsakal

Green Peas Benefits: हिवाळ्यात मटारचा वापर आपण आपल्या आहारात जास्त प्रमाणात करतो कधी मटारची भाजी, मटार पराठा, मटार करंज्या, मटार पुलाव आणि असे अनेक पदार्थ हिव्या वाटाण्यांशिवाय पुर्ण होतच नाही.

चमचमीत आणि खुशखुशीत जेवणासाठी मटार हे आवश्यक असतातच.मटारमधल्या व्हिटॅमिन सीमुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

● हिरव्या वाटाण्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, एपिक्टिन, कॅरोटीनोईड्स आणि अल्फा-कॅरोटीन असतात ज्याचा फायदा आपल्या त्वचेला होतो. हिवाळा आला की बाजारात मटार उपलब्ध होतात. हे गोड चवीचे वाटाणे जेवणात मिसळले की जेवणाची चवही अप्रतिम होते.

● मटारमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिड असते जे त्वचेसाटी अनुकूल ठरते. यामुळे त्वचेला जळजळीचा त्रास होत नाही. मटारमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो जो रक्तातील साखर  नियंत्रित करतो. मटारमध्ये व्हिटामिन के ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येपासून शरीराचे रक्षण करते.

● तुमच्या हाडांसाठीही मटारचा उपयोग चांगला होतो आणि हाडं मजबूत होतात. मटारमध्ये फायबरचे  प्रमाण जास्त असण्याने त्याचा फायदा शरीराला होतो. यामुळे वजनाची वाढ होत नाही आणि लठ्ठपणाचा त्रासही होत नाही.

● मटार हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

आजच्या लेखात आपण खायला खमंग खरपुस मटर कचोरी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

Matar Kachori Recipe
Winter Recipe: हिवाळ्यात शरीराला हेल्दी ठेवणारा स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स कसा तयार करायचा?

साहित्य:

  • एक वाटी मटार 

  • हिरव्या मिरच्या

  • एक तुकडा आले

  • आठ दहा पाकळ्या लसूण

  • एक कप मैदा

  • ओवा

  • चवीनुसार मीठ

  • जिरे

  • हिंग

  • तीळ

  • कांदा

  • हळद पावडर

  • धने पावडर

  • गरम मसाला

  • काश्मिरी लाल मिरची

  • आमचूर पावडर

  • तेल

Matar Kachori Recipe
Winter Recipe: टेस्टी अन हेल्दी अननसाचा शिरा कसा तयार करायचा?

कृती:

कचोरी बनवण्यासाठी मटार, हिरवी मिरची, आले, लसूण एकत्र करून घ्या. हे मिश्रण बाजूला ठेवा.आता मैदा, ओवा, मीठ आणि तेल एकत्र करा आणि एक गुळगुळीत पीठ मळून घ्या.

पीठ काही वेळ कापडाने झाकून ठेवावे.नंतर कढईत थोडे तेल, जिरे, हिंग, तीळ आणि कांदा घालून चांगले परतून घ्या. नंतर मटारचे मिश्रण घाला, चांगले मिसळा. हे पाच मिनिटे शिजवा.

नंतर हळद, धणे, गरम मसाला, मीठ, काश्मिरी लाल मिरची, सुकी कैरी पावडर आणि चिरलेला काजू घाला. हे मिश्रण थंड होऊ द्या.

आता मैद्याच्या पिठाचा गोळा घ्या आणि त्यात मटारचे मिश्रण टाका. लाटून गरम तेलात तळून घ्यावी चवदार वाटाणा कचोरी तयार आहे. ही कचोरी हिरवी चटणी किंंवा दही सोबत सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com