World Food Day 2021: चांगल्या आरोग्यासाठी बदला खाण्याच्या 'या' सवयी

World Food Day 2021: चांगल्या आरोग्यासाठी बदला खाण्याच्या 'या' सवयी

150 देशांमध्ये 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो.
Published on

नवी दिल्ली : दरवर्षा 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. चांगला पोषण आहारच्या धोरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी 150 देशामध्ये हा दिवस साजरा केला जातो.

अन्नामुळे पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला जीवन आणि पोषण मुल्ये मिळविण्याची समान संधी मिळत आहे. आरोग्यदायी आणि आनंदी समाज घडविण्याच्या दिशेने सुरु उचलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या खाण्याच्या सवयींचा पृथ्वीवर लक्षणीय परिणाम होत असतो, म्हणूनच जबाबदारीने आणि कमी प्रभाव होईल अशा खाण्याच्या सवयी जोपासणे गरजेचे आहे. कृषी अन्न प्रणाली आणि उत्पादनाच्या पध्दती स्विकारणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. चांगले वातावरण आणि भविष्याच्या निर्मितीसाठी चांगले अन्न पुरविण्यासोबतच विश्वसनीय उत्पादन करणे देखील महत्त्वाचे आहे.

World Food Day 2021: चांगल्या आरोग्यासाठी बदला खाण्याच्या 'या' सवयी
World Food Day 2021: शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काय करावे?

अन्नाच्या मर्यादित साठ्याकडे पाहता उत्पादन वाढविण्याणसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 16 ऑक्टोबर 1945 रोजी रोममध्ये ‘अन्न आणि कृषी संघटना (FAO) ची स्थापना केली. उपासमारीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माणकरण्यासाठी सन 1980 पासून 16 ऑक्टोबरला 'जागतिक अन्न दिवस' साजरा करण्यास सुरवात झाली. यावर्षी हा दिवस ‘चेंज द फ्यूचर ऑफ मायग्रेशन. इन्व्हेस्ट इन फूड सेक्युरिटी अँड रूरल डेव्हलपमेंट.’ या संकल्पनेखाली साजरा केला जात आहे.

World Food Day 2021: चांगल्या आरोग्यासाठी बदला खाण्याच्या 'या' सवयी
पार्टनरसोबत शेअर करू नका 'हे' सिक्रेट, नाते होऊ शकते खराब!

जागतिक अन्न दिवस निमित्त FAOने ट्विट केले आहे.'' आपल्या खाण्याच्या सवयींचा परिणाम अन्नाची निर्मिती, पोषण मुल्य, वातावरण आणि आपल्या आयुष्यावर होतो. शाश्वत जगाच्या निर्मितीसाठी आपण सर्वजण #FoodHeroes होऊ शकतो. आपली कृती आपले भविष्य आहे!'' असा संदेश त्यांनी ट्विटमधून दिला आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI)देखील जागतिक अन्न दिवस निमित्त आज ट्विट केले आहे. "या जागतिक अन्न दिनी आपले भविष्य अधिक आरोग्यादायी आणि निरोगी बनविण्यासाठी आपण एकत्र येऊ या. आपली कृती आपले भविष्य आहेत -चांगले उत्पादन, चांगले पोषण, चांगले वातावरण आणि चांगले जीवन #EatSafeEatHealthyEatSustainable''

चांगल्या खाण्याच्या सवयींसाठी फॉलो करा या टिप्स

आहाराच्या सवयींमध्ये करा बदल :

शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसहार आधारित अन्नामध्ये कार्बन फूटप्रिंट जास्त असतात, ज्याचा पर्यावरणावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शाकाहारी किंवा व्हिगन आहार किंवा मांसहार कमी करून पृथ्वीवर कमी परिणाम होईल अशा खाण्याच्या सवयी लावायला हव्या

सी-फूड निवडताना घ्या काळजी :

सी- फुड निवडताना जैवविविधतेला हाणी पोहचणार नाही याची काळजी घ्या. मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले पर्याय निवडा आणि असाधारण (exotic) पर्याय निवडणे टाळा.

शिका आणि शिकवा :

चांगल्या (शाश्वत) अन्न सवयींचा स्वीकारण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वत:च्या ज्ञानामध्ये टाकून स्वत:ला आणि दुसऱ्यांना शिक्षित करा. चांगल्या खाण्याच्या सवयींबाबत माहिती देऊन जागरुकता निर्माण करा.

अन्नाचे वाया घालवू नका :

अन्न वाया जाण्यामुले पृथ्वीवरील वातावरणावर गंभीर आणि प्रतीकूल परिणाम होऊ शकतात. अन्न वाया जाऊ नये आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी उत्तम अन्न व्यवस्थापन आणि संघटनांची मदत घ्या.

निर्माण करा आणि वापर करा :

आपल्याला हवे असलेले अन्न आणि मसाल स्वत: निर्माण केल्यामुळे कार्बन फुटप्रिंट कमी होण्यास मदत होतेच, त्याशिवाय अन्नाची नासाडी देखील होत नाही. चांगल्या अन्नाच्या सवयी जोपसण्यासाठी दुकानातून आणलेले वस्तूंऐवजी स्थानिक पातळीवर निर्माण होणारे किंवा स्वत: निर्माण केलेल्या अन्नाला प्राधान्य द्या.

Marathi News Esakal
www.esakal.com