World Sandwich Day: घरच्या घरी झटपट कसे तयार करायचे व्हेजिटेबल सँडविच ?

थोडक्यात काय तर सॅण्डविज हा खरोखरच एक मस्त ब्रेकफास्ट आहे. जेवढा टेस्टी तेवढाच हेल्दी.
World Sandwich Day
World Sandwich DayEsakal

सँडविच असा शब्द जरी उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर ब्रेडच्या मध्ये भरलेल्या भाज्यांचे स्लाईस, चटणी, सॉस मध्ये भरलेला पदार्थ समोर येतो. वेगवेगळ्या रंगीबेरंगी भाज्यांचे सुरेख मिश्रण केलेले असेल, त्यावर मेयोनीज, चीज घालून त्याला सजवले असेल तर हा पदार्थ पाहताक्षणी पोट अर्थे भरलेले असते. त्यामुळेच की काय अनेकजण पोटभरीला योग्य पर्याय म्हणून सँडविचची निवड करतात. आपल्याला वाटेल की हा भारतीय पदार्थ असू शकतो. पण मुळात हा पाश्चिमात्य पदार्थ असून एका माणसाने त्याच्या आवडीसाठी आणि पोट चांगले भरावे म्हणून हा पदार्थ केला. आता तो जगभरात लोकप्रिय आहे. थोडक्यात काय तर सॅण्डविज हा खरोखरच एक मस्त ब्रेकफास्ट आहे. जेवढा टेस्टी तेवढाच हेल्दी.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या सॅण्डविजच्या जन्माची गोष्ट रंजक आहे. इंग्लंडमध्ये जॉन मॉन्टेंग्यू नावाचा एक व्यक्ती होता. त्याला कार्ड गेम खेळायला भारी आवडायचं. गेम खेळताना तो त्याच्या शेफला मीटचा तुकडा ब्रेडच्या दोन स्लाईसच्या मध्ये आणून द्यायला सांगायचा. असं केलं म्हणजे एका हातानी खाणंही व्हायचं आणि त्याचा गेमही थांबायचा नाही. हळूहळू त्याचं पाहून इतर लोकही तसंच करू लागले. आपापल्या चॉईसनी ब्रेडच्या स्लाईसमध्ये हवं ते टाकून खाऊ लागले आणि सॅण्डविजचे वेगवेगळे प्रकार अशा पद्धतीने उदयाला आले.

आज आपण World Sandwich Day स्पेशल घरच्या घरी झटपट कसे तयार करायचे व्हेजिटेबल सँडविच याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत. हे सँडविच नेहमीच्या व्हेजिटेबल सँडविचपेक्षा हे  थोडं वेगळं आहे. 

World Sandwich Day
Tulsi Vivah 2022: तुळशीचे लग्न कसे करावे, सोपी पद्धत जाणून घ्या...

व्हेजिटेबल सँडविचसाठी लागणारे साहित्य 

1) तिन ते चार उकडलेल बटाटे

2) एक कांदा

3) एक टोमॅटो

4) एक हिरवी ढोबळी मिरची

5) जीरे 

6) मीठ – चवीनुसार

7) लाल तिखट

8) धने पावडर

9) गरम मसाला

10) बारीक चिरलेली कोथिंबीर

11) तेल 

12) 8-10 स्लाइसेस ब्रेड

13) बटर 

World Sandwich Day
Recipe: घरच्या घरी सीताफळ रबडी कशी तयार करायची ?

कृती:

सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्याची सालं काढून घ्यावी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटा हा मॅश करून किंवा छोटे तुकडे करून वापरू शकता. आता कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची बारीक चिरून घ्यावी. आता एका कढईत तेल घेऊन त्याला जीरं घालुन फोडणी द्यावी नंतर त्यात हिरवी मिरची आणि कांदा घालावा. 3-4 मिनिटं हे चांगल फ्राय करावे. आता यात टोमॅटो घालावे आणि त्यावर मीठ टाकावे. म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल. नंतर त्यात तिखट आणि धनेपावडर घालावी. हे मिश्रण जेव्हा तेल सोडेल तेव्हा त्यात बटाटा घालुन हे मिश्रण चांगलं परतून घ्यावे. सर्वात शेवटी कोथिंबीर घालावी. आता नॉन स्टिक पॅनवर बटर घालून त्यावर ब्रेड स्लाईस भाजून घ्यावे. नंतर त्यावर बटाटा मिश्रण घालून दुसरा ब्रेड स्लाईस ठेवून बंद करा.तुम्हाला हवं असल्यास हे सँडविच तुम्ही टोस्टर किंवा सँडविच मेकरमध्येही बनवू शकता. सँडविच टोस्ट झाल्यावर टोमॅटो सॉस किंवा चटनीसोबत सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com