esakal | World Vegetarian Day 2021 - दोन अशा शाकाहारी डिश खाल्ल्यावर विसराल मांसाहारी टेस्ट; वाचा रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

दोन अशा शाकाहारी डिश खाल्ल्यावर विसराल मांसाहारी टेस्ट; वाचा रेसिपी

आज अशा दोन रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत, ज्यासाठी काही काळ तुम्ही मांसाहार विसरु शकता.

दोन अशा शाकाहारी डिश खाल्ल्यावर विसराल मांसाहारी टेस्ट; वाचा रेसिपी

sakal_logo
By
स्नेहल कदम

१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शाकाहारी दिवस म्हणून साजरा केला जातो. तज्ज्ञांच्या मते मांसाहारच्या तुलनेत शाकाहारी पदार्थ हे शरीरासाठी विशेष उपयुक्त असतात. (World Vegetarian Day) काही संशोधनांमधून शाकाहार हे अनेक अपायकारक आजारांपासून तुम्हाला दुर ठेऊ शकते असे समोर आले आहे. (Receipe) आज अशा दोन रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत, ज्यासाठी काही काळ तुम्ही मांसाहार विसरु शकता. हे तुम्हाला पटणार नाही. मात्र हे खरं आहे. कोल्हापुरी चवीचा शकाहारी पांढरा रस्सा (Veg Pandhara rassa) आणि नीर फणसाची भाजी या दोन रेसिपी विषयी आपण जाणून घेणार आहोत. (World Vegetarian Day 2021)

नीर फणसाची भाजी -

साहित्य -

 • नीर फणस - १ छोटा

 • मोहरी - आवश्यकतेनुसार

 • जीरे - आवश्यकतेनुसार

 • मीठ - आवश्यकतेनुसार

 • हिंग - आवश्यकतेनुसार

 • तेल - आवश्यकतेनुसार

 • किसलेले ओले खोबरे - आवश्यकतेनुसार

 • बारीक चिरलेली कोथिंबीर - आवश्यकतेनुसार

 • हिरवी मरची - ४

कृती -

सुरुवातील छोट्या आकाराच्या नीर फणसाच्या साली काढून घ्या. यानंतर फणसाचे तुम्हाला हवे असणाऱ्या आकारात काप करुन घ्या. हे काप स्वच्छ धूवुन घ्या. एका बाजूला कढईत तेल टाकून ते गरम करुन घ्या. यात हिरव्या मिरचीचे तुकडे, मोहरी, जीरे आणि हिंग टाका. यानंतर यात फणासाचे काप टाका. हे मिश्रण परतवून घ्या. यात आवश्यकेनुसार हळद आणि गरम मसाला घाला. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही गूळही वापरु शकता. हे मिश्रण पुन्हा एकदा परतवून घ्या. यात थोडेसे पाणी टाका. आता हे मिश्रण मंद आचेवर शिजू द्या. चार ते पाच मिनाटांनी यामध्ये मीठ टाका. भाजी शिजल्यानंतर तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार किसलेले ओले खाबरे आणि चिरलेली कोथिंबीर टाकू शकता. तुमची नीर फणसाची भाजी तयार आहे. चपाती किंवा भाजी सोबत तुम्ही ही भाजी सर्व्ह करु शकता.

कोल्हापुरी चवीचा शाकाहारी पांढरा रस्सा

साहित्य -

 • एका नाराळाचे दुध - ४ कप

 • मीरे - आवश्यकतेनुसार

 • जायफ, वेलची पावडर - आवश्यकतेनुसार

 • हिरवी मिरची - ४

 • तूप किंवा तेल - आवश्यकतेनुसार

कृती -

सुरुवातील नाराळाचे दुध काढून घ्या. हे दुध पुन्हा एकदा तुम्ही गाळून घेऊ शकता. आता एका भांड्यात तेल टाका. ते गरम झाल्यावर यात मीरे टाका. यानंतर मिरची आणि जायफळ, वेलचीची पावडर टाका. ही फोडणी तापली की यात ते नाराळाचे दुध घाला. यानंतर चवीनुसार मीठ घाला. शिजत असताना याला अजिबात उकळी फुटणार नाही याची दक्षता घ्या. अन्यथा शाकाहारी तांबडा रस्सा फुटण्याची शक्यता असते. तुमचा अस्सल कोल्हापुरी चवीचा शाकाहारी पांढरा रस्सा तयार आहे.

loading image
go to top