गणेशोत्सव2019 : गणेशाचे वाहन मूषकच का?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

पुराणात वर्णन केलेल्या सर्व देवी-देवतांचा विचार केल्यास प्रत्येक देवता कोणत्या तरी वाहनावर आरूढ असलेली दिसून येते. उदा. शंकर नंदीवर, कार्तिकस्वामी मोरावर, गणपती उंदरावर इत्यादी. या देवतांच्या वाहनांमागे काय रहस्य दडलेले आहे? गणपतीचे वाहन मूषकच का?

गणेशोत्सव2019 : पुराणात वर्णन केलेल्या सर्व देवी-देवतांचा विचार केल्यास प्रत्येक देवता कोणत्या तरी वाहनावर आरूढ असलेली दिसून येते. उदा. शंकर नंदीवर, कार्तिकस्वामी मोरावर, गणपती उंदरावर इत्यादी. या देवतांच्या वाहनांमागे काय रहस्य दडलेले आहे? गणपतीचे वाहन मूषकच का?

मूषक शब्दाचा विचार केल्यास हा शब्द ‘मूष स्तेये’ या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. या धातूचा संस्कृतमध्ये अर्थ ‘चोरी करणे’ असा आहे. मूषक अर्थात उंदीर ज्याप्रमाणे वस्तूंची चोरी करतो; परंतु पुण्य-पापाने बद्ध होत नाही. त्याप्रमाणे सर्व अंतर्यामी परमात्मा सर्व भोग भोगत असूनसुद्धा पुण्य-पापाने बद्ध होत नाही, असा त्याचा गुढार्थ आहे. त्याचप्रमाणे मूषकावर आरूढ असलेले गणपती देव हे मूषकस्वरूपी दुष्ट प्रवृत्तींचे दमन करीत आहेत, असाही सांकेतिक अर्थ व्यक्त होतो. म्हणूनच, ‘ईश्‍वरः सर्वभोक्ता च चोरवत्तत्र संस्थितः। स एव मूषकः प्रोक्तो मनुजानांः।।’ असे म्हटलेले आहे. 
- गौरव देशपांडे, पंचांगकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Ganpati Vehicle Mouse