गणपती विसर्जनाला मुहूर्त नसतो

- दा. कृ. सोमण
Monday, 2 September 2019

गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाला कुठलीही वेळ किंवा मुहूर्त नसतो. लक्षात घ्या, आपण देवाचे विसर्जन करत नाही, उत्तरपूजा केल्यानंतर त्या मूर्तीत देवत्व संपते, मग आपण राहिलेल्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करतो.

गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाला कुठलीही वेळ किंवा मुहूर्त नसतो. लक्षात घ्या, आपण देवाचे विसर्जन करत नाही, उत्तरपूजा केल्यानंतर त्या मूर्तीत देवत्व संपते, मग आपण राहिलेल्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करतो. पूर्वी वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तीचे विसर्जन व्हावे, असा नियम होता. मात्र तेव्हा मूर्तींची संख्या मर्यादित होती.

आता मूर्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पर्यावरणपूरक आणि प्रदूषण होणार नाही, अशा पद्धतीनेच विसर्जन केले पाहिजे. त्यामुळे घरातच बादलीत, हौदात, कृत्रिम तलावात, तळ्यात, ट्रकवरील मोबाईल हौदात विसर्जन केले तरी काहीही बिघडत नाही. अस्वच्छ घाणेरड्या नदीत विसर्जन करण्यापेक्षा कृत्रिम हौदात विसर्जन करणे केव्हाही चांगले.

(लेखक पंचागकर्ते आणि प्रसिद्ध खगोल अभ्यासक आहेत.)
(शब्दांकन : कृष्ण जोशी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you Know this about Ganpati Visarjan