Ganesh article | eSakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh-banner
पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविड च्या परिस्थितीत होणार नाही...मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर 45 मिनिटानंतर क्रमवारीनुसार इतर मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात होणार आहे.
पुणे : दगडूशेठ हलवाई गणपतीचं हौदात विसर्जन
पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविड च्या परिस्थितीत होणार नाही...मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर 45 मिनिटानंतर क्रमवारीनुसार इतर मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात होणार आहे.
जळगावात ५६ हजारांवर मूर्तींचे विसर्जन
जळगाव : कोरोनाच्या सावटाखाली (Corona Crisis) सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुकीविना पार पडलेल्या विसर्जन (Ganesh Visarjan)उत्सवात ५५ हजारांवर घरगुती व पाचशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या (Ganesh Mandal) अशा ५६ हजारांवर गणेश मूर्तींचे विसर्जन रविवारी पार पडले. ‘बाप्पा चालले गावाला.. चैन पडेना आम्हाला’ या भावनेतून विघ्नहर्त्याला गणेशभक्तांनी निर्विघ्नपणे निरोप दिला.
बार्शीत 15 हजार गणेशमूर्तींचे केले प्रशासनाने विसर्जन!
बार्शी (सोलापूर) : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' असा जयघोष करीत नागरिकांनी भक्तिभावाने नगरपरिषद प्रशासनाकडे गणेशमूर्ती दिल्या. रविवारी अनंत चतुर्दशी (Ganesh Visarjan)दिवशी सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत संकलित केलेल्या शहरातील सुमारे 15 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन रात्री दहा वाजेपर्यंत दोन तलावांत प्रशासनाने केले. कोणतीही मिरवणूक निघाली नाही; मात्र भाविकांचा उत्साह मात्र दिसून आला. मोठ
वाघोलीत घरगुती बाप्पाला निरोप
वाघोली : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जय घोषात अगदी साधे पणाने घरगुती बाप्पाला निरोप देण्यात आला. महापालिकेच्या वतीने दोन फिरते हौद व वाघेश्वर मंदिरात मूर्ती संकलनाची सोय करण्यात आली होती. लोणीकंद पोलिसानी बंदोबस्त ठेवत गर्दी होऊ दिली नाही.
बाप्पाचा परतीचा प्रवास 'विसर्जन'
लेखक - सुनील शिरवाडकर.नाशिक : मला काही काही लोकांचं खुप आश्चर्य वाटतं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे लोक सकाळीच गणपती विसर्जनाला निघतात. अगदी नऊ काय आणि दहा काय. गणपती विसर्जित करायचा...पण कधी? दुपारी त्याला छान नैवेद्य दाखवायचा. जरा वेळ आराम करु द्यायचा. दुपारी चार पाच नंतर चहापाणी झालं की मग त्याला निरोप द्यायचा. हो..आणि अगदी उशिरा पण नको. आई म्हणायची फार उशीर नको...संध्याकाळी अंधार पडायच्या आत तो
नागपूरच्या राजा गणपतीला निरोप; वातावरण झाले भावुक
नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात गणेशाची स्थापना होत असते. येथील विविध गणपती प्रसिद्ध आहेत. दहा दिवसांच्या काळात गणपती बघायला नागरिक चांगली गर्दी करीत असतात. मात्र, मागच्यावर्षीपासून सुरू झालेले कोरोनाचे विघ्न यंदाही कायम असल्याने नागरिकांना साध्या पद्धतीने गणेशाची स्थापनापासून विसर्जन करावे लागत आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही नागपूरच्या राजा गणपतीची साध्या पद्धतीने कोराडी येथील तलावात विसर्जन करण
Ganesh Visarjan : हिंगोलीत गणपती  विसर्जनास सुरूवात
हिंगोली : हिंगोली (Hingoli) शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) पालिका प्रशासनाने सहा ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असुन रविवारी (ता.१९) येथे घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. ना बँड, ना ताशा, ना मिरवणूक, ना जयघोष शांतपणे केले जातेय गणपती विसर्जन. हिंगोली नगरपालिकेने (Hingoli Municipal Council) बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरात सहा ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण
दर वर्षी गणेशस्थापना अन् विसर्जन का?
श्रीगणेश पुराण धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्रीगणेशाची आराधना केली आणि गणपतींना महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपतींनी होकार दिला. हे लिखाण दिवस-रात्र चालले आणि त्यामुळे गणपतींना थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज्य झाले. अशा वेळी गणपतींच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यासांनी श्री ग
जळगाव जिल्ह्यात ११०० सार्वजनिक गणेश मंडळांतील 'श्री' आज विसर्जन
जळगाव ः नऊ दिवसांपासून श्री गणेशोत्सव सुरू (Ganesh Utsav) आहे. विघ्नहर्त्या गणेशाला सर्वांनीच कोरोनापासून (Corona) सर्वांना मुक्ती दे, दृष्ट प्रवृत्तीपासून सर्वांचे रक्षण कर, असे साकडे घातले. आज सर्वत्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन (Ganesh Visarjan) करण्यात येणार आहे. विसर्जनाची तयारी जिल्हा व तालुका प्रशासनाने (Administration)पूर्ण केली आहे. विसर्जनस्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोबतच ठिक
सातारा : जिल्‍ह्यात आज 3 हजार 65 बाप्‍पांचे विसर्जन
सातारा : दहा दिवस मनोभावे आराधना केल्‍यानंतर सातारकरांनी गणेशाला निरोप देण्‍याची तयारी सुरु केली आहे. परंपरेनुसार आज जिल्‍ह्याच्‍या विविध भागात ३ हजार ६५ सार्वजनिक मंडळांच्‍या मुर्तींचे विधीवत विसर्जन होणार आहे. या विसर्जनासाठीची आवश्‍‍यक ती तयारी जिल्‍हा प्रशासनाने केली आहे.
Pimpri : आनंदोत्सवाची आज सांगता
पिंपरी : दहा दिवस मनोभावे भक्ती केल्यानंतर रविवारी (ता. १९) लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नदीपात्रात मूर्ती विसर्जनाला मनाई असल्याने महापालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले आहे. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी महापालिकेसह पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
दर वर्षी गणेशस्थापना अन् विसर्जन का?
गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला गेला. आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी गणेशस्थापना आणि विसर्जन का केलं जातं?श्रीगणेश पुराण धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्रीगणेशाची आराधना केली आणि गणपतींना महाभारत लिहिण्याची विनंती केल
Kolhapur : इराणी खण परिसर बंदिस्त
कोल्हापूर : सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांना रविवारी कोल्हापूरकर निरोप देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी यंदाही मिरवणुकांना फाटा दिला जाणार असून इराणी खणीतच मूर्तींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण खण परिसर बंदिस्त केला असून संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. दरम्यान, महापालिकेने विसर्जनाची सर्व तयारी पूर्ण केली आहे.
गणेशमुर्ती विसर्जनाची 'या' ठिकाणी सोय! गर्दी नकोच, हालचालींवर पोलिसांचा वॉच
सोलापूर: कोरोनाच्या सावटाखाली रविवारी (ता.19) श्री गणरायाचा विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी 100 संकलन केंद्रे तर 11 विसर्जन केंद्रे आहेत. त्याठिकाणी 310 पोलिस व 700 महापालिका कर्मचारी आणि 72 गाड्या असतील. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मूर्ती संकलन केले जाणार आहे. नागरिकांनी संकलन केंद्रांवर मूर्त
विसर्जनस्‍थळासह मार्गावर CCTVची नजर! पालिकेची तयारी पूर्ण
सातारा: गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, तसेच निर्विघ्न पार पडावी, यासाठीची तयारी पालिकेने केली असून, विसर्जनस्‍थळासह संपूर्ण मार्गावर सुमारे १०० सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांच्या माध्‍यमातून नजर ठेवण्‍यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरासह हद्दवाढीतील भागात पालिकेने विसर्जनासाठी ३० कुंड ठेवले आहेत.
गणेशोत्सव विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
सोलापूर: कोरोनाच्या सावटाखाली रविवारी (ता.19) श्री गणरायाचा विसर्जन सोहळा भक्‍तीमय वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी 100 संकलन केंद्रे, 11 विसर्जन केंद्रे आदी ठिकाणी 310 पोलिस कर्मचारी, 700 महापालिका कर्मचारी व 72 गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मूर्ती संकलनासाठी सकाळी सात ते सायंक
श्रीगणेश व श्रीराम : सुंदर साम्यस्थळे!
श्री गणेशांच्या हातातील दिव्य शस्त्रे म्हणजे एकेक देवताच आहेत. हातातील कमळ हे सृष्टीनिर्माता ब्रह्मदेवांचे प्रतीक, अंकुश हे संचालक विष्णूंचे आणि परशू हे निर्दालक शंक‍रांचे प्रतीक आहे. शस्त्रांवर धारणकर्त्याबरोबरच या देवतांवरही त्यांचे नियंत्रण असते, असे गाणपत्य संप्रदायात समजले जाते. गणेश उपासनेच्या सहा संप्रदायातील हरिद्रागणपती संप्रदायाची अशी मान्यता आहे की, रुद्र, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आदि दे
गणरायाला आज निरोप
पुणे : महापालिकेने गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण केली असून, कोरोनामुळे गणरायाला रविवारी (ता. १९) साधेपणाने निरोप दिला जाणार आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह क्षेत्रीय कार्यालये, नगरसेवक आणि आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून सुमारे दोनशे फिरते हौद विसर्जन सेवेत असणार आहेत. मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रही निश्चित करण्यात आले आहेत.
कलांचा अधिपती नाशिकचा संगीतसाक्षी गणेश!
लेखक - सुनील शिरवाडकरनाशिक : गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास.आज आपण जाणुन घेतोय ज्या गणेशाच्या साक्षीने अनेक कलाकारांच्या सांगितिक वाटचालीस सुरुवात झाली असा कलांचा अधिपती 'संगीतसाक्षी गणेशाची' कहाणी.
सलग दुसऱ्या वर्षी निलगार गणपतीचे दर्शन बंद
संकेश्वर : कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील नवसाला पावणाऱया निलगार गणपतीचे दर्शन यंदा सलग दुसऱ्या वर्षी बंद आहे. त्यामुळे लाखो भाविकांची हिरमोड झाली आहे. तसेच येथील व्यापाऱ्यांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.तीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या हेद्दूरशेट्टी परिवाराच्या गणपतीच्या दर्शनाला गत तीस वर्षात गर्दी होताना दिसत आहे. पण कोरोनाच्या पार्श्
जेजुरीचा देखावा पाहण्यास आली, बानू म्हणजे इशा केसकर
खडकवासला : शिवणे येथे गणपतीला जेजुरीचा खंडेराया, मंदिर परिसरात कुलाचार करणारा कुटुंबातील २२ सदस्य, असा हा देखावा दांगट परिवाराने सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी गाजलेल्या जय मल्हार मालिकेतील मल्हार देवाची दुसरी पत्नी बानू म्हणजे ईशा केसकर आवर्जून आली होती.
गणेशोत्सवातून ऐक्याचा संदेश देणारे सय्यदभाई
हडपसर : माणूस म्हणून प्रत्येकाच्या जाती धर्माचा आणि सरळ भावनांचा आदर केला पाहिजे; त्यातूनच खऱ्या अर्थाने आपण सामाजिक सलोखा राखू शकतो, असे सांगत गेली पन्नास वर्षाहून अधिक काळापासून गणेशोत्सव व मोहरम सारख्या सणांच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याचे काम हडपसर येथील सेवादल कार्यकर्ते अब्दुल सय्यद आपल्या कृतीतून करीत आहेत. एक्काहत्तर वर्षीय सय्यदभाई हे एक छायाचित्रकार, चित्रकार व मूर्ती
विसर्जनस्थळी गणेश आरतीस सक्त मनाई
सातारा : गणेशोत्‍सवाची (Ganeshotsav 2021) सांगता रविवारी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी होत आहे. परंपरेप्रमाणे या दिवशी, तसेच गणेशोत्‍सवाच्‍या नवव्‍या दिवशी (ता. १८, ता. १९) साताऱ्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्‍या, तसेच घरगुती गणेशाच्‍या मूर्तीचे विसर्जन होते. विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलाव तयार केले असून, यासह इतर ठिकाणी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी विसर्जनस्‍थळी आरतीस मनाईबरोबरच घर
तांब्याच्या ६ फुटी गणेशमूर्तीने नाशिकच्या वैभवात भर
नाशिक : श्रीराजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे २०१३ मध्ये देशातील एकमेव तांब्याची सहा फुटी गणेशमूर्ती साकारण्यात आली. मुस्लिम कारागिरांकडून तयार करण्यात आलेली ही मूर्ती शहराच्या वैभवात भर पाडणारी ठरली आहे.
जळगावात ‘श्रीं’च्या विर्सजन स्थळावर ‘ड्रोन’ची राहणार नजर
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग(Disaster Management Department), वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र आणि जीवरक्षक शोध व बचाव पथक(Wildlife Conservation Society Squad), निर्माल्य संकलनासाठी श्रीसेवक असे ४० सभासद जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सूचनेनूसार मेहरुण तलावावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) राहणार आहेत. उद्या रविवारी (ता. १९) आपल्या लाडक्या गणराय
साताऱ्यातील वाहतुकीत दोन दिवस बदल
सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरातील वाहतुकीत बदल करण्‍यात आल्‍याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. गणेशोत्‍सवाची (Ganeshotsav 2021) सांगता परंपरेनुसार रविवारी होणार असली, तरी सातारा शहरातील बहुतांश मंडळे प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीच्‍या (Anant Chaturdashi) आदल्‍या दिवशी सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन करत असतात.
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करणारे सहकार मित्र मंडळ
पंढरपूर (सोलापूर) : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सहकार गणेशोत्सव मित्र मंडळाने पंढरीत (Pandharpur) एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) साजरा करताना अनावश्‍यक खर्चाला फाटा देत या मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मागील 41 वर्षांपासून सहकार गणेशोत्सव मित्र मंडळाचे सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
नाशिकमधील सर्वात जुने आणि प्राचीन मंदिर : 'तिळा गणपती'
लेखक - सुनील शिरवाडकर.नाशिक : गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास.आज आपण जाणुन घेतोय ज्या बाप्पाला तिळगुळ दिल्याशिवाय नाशिककरांची संक्रांत पुर्ण होत नाही अशा 'तिळा गणपती' बाप्पाचा इतिहास.असं म्हटलं जातं की नाशिकमधील सर्वात जुने, प्राचीन मंदिर म्हणजे तिळा गणपती मंदिर. अगदी काळाराम, कपालेश्वर मंदिराच्याही आधी याचे बांधकाम झाले
जेव्हा बाप्पा सर्वसमावेशकतेचं प्रतिक बनतो....
पुणे : गणेशोत्सव सर्वांचा उत्सव. भक्तीभावाबरोबरच मनंही जोडणारा. हा उत्सव साजरा करायला वयाचं बंधन येत नाही तसंच शारिरिक व्यंगाचंही. नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक्स स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी आपल्याला मिळालेल्या विशेष प्राविण्यातून भारतीयांची मनं जिंकली. त्यांच्या यशात सारे भारतीय सहभागी झाले. नेमका हाच धागा पकडून पुण्याच्या विलास जावडेकर डेव्हलपर्सनी हाच यंदाचा गणेशोत्सव आगळ्या पद्धतीने साजरा कर
विदर्भाचे अष्टविनायक : चिंतामणी अन् वरदविनायक गोराळा गणपतीचं महत्व
नागपूर : महाराष्ट्रातील अष्टविनायक सर्वांना माहिती आहे. तसेच गणेशोत्सव म्हटलं की, मुंबई आणि कोकणात धुमधडाक्यात गणेशोत्सव (ganesh festival 2021) साजरा केला जातो. पण, राज्याच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणून विदर्भाची (ganesha in vidarbha) ओळख आहे. याच विदर्भात सर्वगुणसंपन्न् अशा प्रदेशात गणपतीची अनेक मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. अशाच विदर्भातील अष्टविनायकाचे (vidarbha ashtavinaya
गणेश पूजेसाठी दुर्वा मिळणे झाले अवघड
केतूर (सोलापूर): आधुनिक, प्रगत शेती करण्याच्या हव्यासापोटी शेतकरी तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहे. गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या दुर्वा अर्थात हराळीच्या जुडीसाठी सध्या मोठे प्रयास करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
गणेश विसर्जनाला पुण्यात निर्बंध, पाहा काय आहेत नियम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील निर्बंधाची घोषणा केली.
गणरायाला निरोप देण्यासाठी मेहरुण तलाव सज्ज
जळगाव ः येत्या रविवारी (ता. १९) अनंत चतुर्दशीनिमित्त विसर्जन (Ganesh Visarjan) आहे. त्यानिमित्त महापालिकेतर्फे मेहरूण तलाव (Jalgaon Municipal Corporation) विसर्जनासाठी सज्ज करण्याची तयारी सुरु आहे. तलावात मूर्ती विसर्जन करताना कोणाचा तोल जाऊन अपघात घडू नये, यासाठी तलावाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा कठडे उभारले जात आहे. याठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी खास तराफे तयार केल
गणेशोत्सवात मिठाई विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर गोडवा
नाशिक : गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य देण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे मोदक मिठाईच्या स्वरूपात असतात. घरगुती गणपती, मंडळांच्या गणपतीच्या नैवेद्यासाठी मिठाईच्या दुकानांमध्ये चांगलीच गर्दी होत आहे. गतवर्षी गणेशोत्सवात निर्बंध होते. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा निर्बंध उठल्याने अन् ग्राहकांचा प्रतिसादही चांगला असल्याने गणेशोत्सवात मिठाई विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर गोडवा द
गजवदन सुरंगी रंगसाहित्यरंगी।
गणांचा अधिपती असलेला, चौदा विद्या चौसष्ट कलांचा दाता असा गणेश हा विविध संतांच्या,उपासकांच्या आणि कवींच्याही चिंतनाचा विषय ठरला नसावा तर नवल!मनांवर अधिराज्य गाजविणाऱ्या आधुनिक युगातील चित्रपटसृष्टीलाही गजाननाने मोहून टाकले आहे याचा प्रत्यय विविध गीतांमधून अनुभवाला येतो.नृत्यगणेशाचे समर्थ रामदासस्वामींनी केलेले वर्णन वाचून आपलं भानही हरपून गेलं असेलच. गणेशाचं तात्त्विक रूप महाराष्ट्र मनात सोप्या शब्
किती घेशील दो कराने...
अनंत करांनी प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात ‘सौर ऊर्जेचं दान देणारा हा दाता आपल्या अस्तित्वाच्या ‘केंद्रस्थानी’ आहे. आपले जग त्याच्याभोवती फिरते! पृथ्वीवासियांसाठी भविष्यात सौर ऊर्जाच तारणहाण ठरणार आहे.ब्रह्मांडात अब्जावधी तारे आहेत. यातले कित्येक तारे सूर्यापेक्षा हजारोपटींनी मोठे आहेत. परंतु पृथ्वीवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा तारा म्हणजे आपला सच्चा ‘मित्र’ अर्थात दिवाकर किंवा सूर्य! ४.५ अब्ज वर्
जगाच्या कल्याणासाठी दिवसरात्र तप करण्यास बसलेला 'तपस्वी गणेश'
लेखक - सुनील शिरवाडकर.नाशिक : गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास.आज आपण जाणुन घेतोय दिवसरात्र जप करणाऱ्या आणि स्वतः गणरायाने आपले ठिकाण ठरवून आसनस्थ झालेल्या तपस्वी गणेशाचा इतिहास.फार नाही...शंभर वर्षापुर्वीची गोष्ट. मराठे नावाचं एक सरदार घराणं होतं नाशकात. त्यांच्या घरात एक गणेश मुर्ती होती. पिढ्यानपिढ्या त्याचे पुजन होत होत
पालिका गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन
एरंडोल: येथील पालिका कर्मचारी गणेश मंडळाच्या गणपतीचे साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. पालिका कर्मचारी गणेश मंडळातर्फे दर वर्षी पाचव्या दिवशी मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन केले जाते. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे कर्मचाऱ्यांनी साध्या पद्धतीने विसर्जन केले. या वेळी मुख्याधिकारी विकास नवाळे, विक्रम घुगे, सुरेश दाभाडे, आर. के. पाटील, योगेश सुकटे, लक्ष्मण पाटील, विकास पंचबुद्धे, संदीप शिंपी,
विदर्भाचे अष्टविनायक 3 : सर्वोभद्र गणपती अन् शमी विघ्नेशाचं महत्व
नागपूर : महाराष्ट्रातील अष्टविनायक सर्वांना माहिती आहे. तसेच गणेशोत्सव म्हटलं की, मुंबई आणि कोकणात धुमधडाक्यात गणेशोत्सव (ganesh festival 2021) साजरा केला जातो. पण, राज्याच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणून विदर्भाची (ganesha in vidarbha) ओळख आहे. याच विदर्भात सर्वगुणसंपन्न् अशा प्रदेशात गणपतीची अनेक मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात. अशाच विदर्भातील अष्टविनायकाचे (vidarbha ashtavinaya
पुणे  : विहीर खोदताना सापडलेली दशभुज चिंतामणी मूर्ती
पुणे: प्राचीन काळातील मूर्ती कपाळावर ओंकार, तीन दोळे, उज्वी सोंड, सोंडेवर रत्नकलश, उजव्या हातामधे मोदक, डाव्या हातात तुटलेला हाथ, आठ हातांमध्ये अनुक्रमे पाश, अंकुश, कमळ, गदा, तोमर, धान्याचे कणीस, त्रिशूळ आणि धनुष्य धारण केलेले व दगडाचा रंग तांबूस, उंची २ फूट सहसा भागात आढळून येत नसल्याने हेच मूर्तीचे वैशिष्टये मानले जाते. श्री खळदकर समर्थभक्त असल्याने त्यांनी देवाचे नाव श्रीसमर्थ वरद सिद्धिविनायक
पुणे : गुंडांचा गणपती...
पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे. पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस आंचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. 'त्याच्या घराजवळील गणपती' असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे.पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. य
साताऱ्यातील पाच मानाच्या गणपतींचं महत्त्व आजही कायम!
सातारा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2021) सुरूवात केली होती. यामुळे राजधानी साताऱ्यात गणेश उत्सवाला (Satara Ganpati Festival) विशेष महत्त्व आहे. साताऱ्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा सलग दुसऱ्या दिवशी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर विरजन पडलंय. काळानुसार साताऱ्यात गणेशोत्सवाचं स्वरुप बदलल
निर्माल्य संकलनासाठी तरुणाई सरसावली
रत्नागिरी: गौरी-गणपती विसर्जनादिवशी नदी किनारी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. ते किनाऱ्यावर इतरत्र पसरू नये, यासाठी वाटद येथील तरुणांनी निर्माल्य गोळा केले आणि त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. ग्रामीण भागामध्येही पर्यावरणपुरक उपक्रमांची अंमलबजावणी या निमित्ताने होऊ लागली आहे. त्याची सुरवात वाटदच्या तरुणांनी केली आहे.तालुक्यातील वाटद येथेही देखील मोठ्या संख्येने गौरी गणपती विसर्जन झाल
'श्री'चे जागेवरच विसर्जन, पालिकेचा अनोखा उदगीर पॅटर्न
उदगीर (जि.लातूर) : शहरातील (Udgir) सार्वजनिक गणेशाचे आरती करून नगरपालिकेच्या वाहनात गुरूवारी (ता.१६) जागेवरच विसर्जन(Ganesh Immersion) करण्यात आले. या वर्षी नगरपालिकेच्या विसर्जनाचा अनोखा पॅटर्न राबवून विसर्जन शांततेत झाले. यावेळी पहिल्या व मानाच्या पारकट्टी गल्लीतील (Latur) आजोबा गणपतीच्या महाआरतीने श्री विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाध
दाजी पेठेतील वीर गणपती ट्रस्टने जपली समाजसेवेची परंपरा
सोलापूर : शहरातील दाजी पेठ भागातील वीर गणपती (Veer ganpati) मंडळाने झांज पथक, शिस्तबद्ध मिरवणूक आदींसाठी सातत्याने बक्षिसे मिळवली आहेत. (Ganesh Chaturthi) चारादान, धान्य किट वाटपासह अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील केले आहे. 2013 मध्ये या वीर गणपती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मंडळाने सातत्याने अनेक सामजिक कामांची सुरवात केली. सुरवातीपासून मंडळाने शिस्तीला प्राधान्य देत शिस्तबद्ध व
वंदन व्रातपतिला.. वंदन प्रमथेशाला।
समाजात विद्वान, सदाचारी, समाजाचे नीतिनियम आचरणारे लोक असतात तसेच समाजापासून वेगळे राहणारे, समाजाच्या चालीरीती न स्वीकारणारेही असेही लोक आपण अनुभवत असतो. वैदिक काळातही समाजरचनेत विविध गट अस्तित्वात होते असे विविध ग्रंथांमधील संदर्भांवरून दिसून येते.यजुर्वेदातील रुद्रसूक्तामध्ये रुद्र ही देवता चोरांचीही मानली गेली आहे तसाच अथर्वशीर्षात गणपती हा व्रात्यांचा अधिपती मानला गेला आहे. व्रात्य म्हणजे खोडकर
‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ स्पर्धेत थोरात प्रथम
पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत चिंचवड येथील इशिता थोरात यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पिंपळे सौदागर येथील राज आगिवाले यांनी द्वितीय आणि साने आळी तळेगाव येथील संध्या टकले यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी (ता. १०) ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ ही अर्धदैनिक आकारातील पुर
कोल्हापूर: गणेश मूर्तीवरील चांदीचे दागिने लंपास
कोल्हापूर: टिंबर मार्केट राजाराम चौकातील मंडळाच्या मूर्तीवरील सुमारे ७० हजाराचे चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टिंबर मार्केट राजाराम चौक येथील ‘छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळ’ प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करत आहे. मूर्तीवर मंडळाच्या सदस्यांनी चांदीचे दागिने अर्पण केले
पुणे: पाचव्या दिवशी ५८ हजार मूर्तींचे विसर्जन
पुणे: पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला पुणेकरांनी मंगळवारी निरोप दिला आहे. महापालिकेच्या संकलन केंद्रावर व फिरत्या हौदामध्ये ५८ हजार ५९६ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वाधिक १६ हजार १५१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नगरसेवकांनी ३३ फिरते हौद पुरविल्याचे नागरिकांना दिलासा मिळाला.
बेळगाव: गणपतीचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
बेळगाव: बेळगाव शहरातील घरगुती गणेशोत्सव आणि देखावे यांचे अतुट नाते आहे. यामुळे शहरातील अनेक घरात आपल्याला घरगुती देखावा पाहायला मिळतो. शहरासह ग्रामीण भागातही बहुतांशी घरात गणेशोत्सवाच्या कालावधीत हालते देखावे करण्याची परंपरा आहे. यंदाही अनेकांनी आपल्या घरातील गणपती बाप्पांसमोर हालते देखावे साकारले आहेत. हे आकर्षक देखावे पाहण्यासाठीही गर्दी होत आहे.
गडहिंग्लज : तेवीस हजार गणेश मूर्तींचे पर्यायी व्यवस्थेत विसर्जन
गडहिंग्लज: गडहिंग्लज तालुक्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात दोन हजाराहून अधिक तर ग्रामीण भागात २१ हजार ५७५ गणेश मूर्ती पर्यायी व्यवस्थेत विसर्जित करण्यात आल्या. तसेच साडेआठ टन निर्माल्याचे संकलन झाले. प्रशासनाच्या प्रयत्नांना स्थानिक तरुण मंडळांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे पाणी प्रदुषण रोखण्यास मोठी मदत झाली आहे.
go to top