esakal | प्रथम तुला वंदितो...!
sakal

बोलून बातमी शोधा

प्रथम तुला वंदितो...!

प्रथम तुला वंदितो...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ.आर्या जोशी

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता अशा शब्दात गणपतीचे स्तवन नेहमीच केले जाते. गणपतीचा विघ्ननाशनाचा हा गुण त्याच्यामध्ये कसा आला हे समजून घेणे काहीसे रंजकही आहे.

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा।

संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते।।

कोणत्याही शुभप्रसंगी गणेशाचे स्मरण केले की तो विघ्ने दूर करतो अशा आशयाचा हा श्लोक आहे.

हेही वाचा: गणेश विसर्जनाशिवाय किनाऱ्यांवर अन्य कोणालाही प्रवेश नाही

एखाद्या देवतेच्या रूपाचा विकास होत असताना त्यात वेगवेगळी स्थित्यंतरे येत असतात. असाच हा एक बदल जाणून घेऊयात. गणपतीचे बाह्य रूप बदलत गेले तसाच त्याच्या तात्त्विक रूपातही बदल होत गेला असं आपल्याला दिसून येतं.

विनायक हे गणपतीचं एक प्रसिद्ध नाव. शान्तिमयूख ग्रंथात विनायक नावाच्या सहा गणांचा उल्लेख येतो.मित, संमित, कटंकट, कूष्मांड, राजपुत्र आणि शाल हे ते सहा गण होत. हे विनायक गण लोकांच्या कामात बाधा आणत, त्यांचा लोकांना त्रास होत असे. वराह पुराणातील आख्यायिका आहे की, ऋषींच्या यज्ञकार्यात नेहमी बाधा येत असे. ती दूर करण्यासाठी ते शंकराकडे गेले आणि त्यांनी त्याची प्रार्थना केली. शंकराने स्वतःच्या सामर्थ्याने शस्त्रधारी, निळ्या रंगाचे, हत्तीचे तोंड असलेल्या अशा विनायक गणांची निर्मिती केली. स्वतःच्या मुखापासून तयार केलेल्या कुमाराला त्याने या गणांचा मुख्य म्हणून नेमले आणि त्याला वर दिला की तुला गणेश, विनायक अशी नावे लाभतील. शंकराने दिलेल्या वरामुळे विनायकांचा अधिपती असलेल्या गणेशाचे कार्यारंभी विघ्नहर्ता म्हणून स्मरण, पूजन होऊ लागले.

हेही वाचा: गणेश विसर्जनाशिवाय किनाऱ्यांवर अन्य कोणालाही प्रवेश नाही

गाणपत्य संप्रदायात तसेच अन्य पुराणातही अशा विविध आख्यायिका आढळून येतात.यातून घेण्याचा बोध असा की वाईट कामे करणाऱ्या व्यक्ती, सद्वर्तनी सत्शील नेतृत्वाच्या आधिपत्याखाली असल्यास त्यांचे परिवर्तन होणे कठीण नाही. मात्र त्यासाठी नेत्यामध्ये कुशलता आणि सदाचार असणे आवश्यक आहे. आपणही समाजामध्ये विविध प्रकारचे संघटन करताना दुष्ट प्रवृत्तीवर मात करून त्या विधायक कशा होतील, त्यातून सर्वांचे कल्याण कसे साधता येईल याचा विचार या गुणवैशिष्ट्यातून जरूर करावा.

loading image
go to top